इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2025 हंगामाचा मेगा लिलाव सोमवारी (25 नोव्हेंबर) जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडला. दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात 10 संघांनी 639.15 कोटी रुपये खर्च करून एकूण 182 खेळाडूंना खरेदी केले. ज्यामध्ये रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी इतिहास रचला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पंतला 27 कोटी रुपयांना विकत घेतले. अशाप्रकारे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर बनला आहे. दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर श्रेयस अय्यर ठरला असून. पंजाब किंग्जने त्याला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
दुसरीकडे, असाही एक देश समोर आला आहे ज्याचा एकही खेळाडू विकला गेला नाही. मोठी गोष्ट म्हणजे या देशातील 12 खेळाडूंनी लिलावात प्रवेश नोंदवला होता. मात्र 2 खेळाडूंशिवाय अन्य कोणाचेही नाव बोलीसाठी घेण्यात आले नाही.
हा दुसरा कोणता देश नसून बांग्लादेश आहे. जिथे सत्तापालटानंतर हिंदूंवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नुकतेच हिंदू पुजारी आणि इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना बांग्लादेशमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात ज्यामध्ये 12 बांग्लादेशी क्रिकेटपटू निवडले गेले. यापैकी फक्त मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन यांचीच नावे बोलीसाठी पुढे आली. पण त्यांनाही कोणी विकत घेतले नाही. उर्वरित 10 खेळाडूंमध्ये लिटन दास, तस्किन अहमद, शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, शॉरीफुल इस्लाम आणि तन्झीम हसन शाकिब यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. मात्र यापैकी एकही नाव लिलावात पोहोचले नाही. त्यांना कोणीही विकत घेतले नाही.
अशा प्रकारे, असे म्हणता येईल की पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही आयपीएलमधून बाजूला होत आहे. असेच सुरू राहिल्यास भविष्यात बांग्लादेशी क्रिकेटपटूही आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका संभवू शकतो.
आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी झालेले बांगलादेशी क्रिकेटपटू
मुस्तफिजुर रहमान 2 कोटी
तस्किन अहमद 1 कोटी
शाकिब अल हसन 1 कोटी
मेहदी हसन मिराज 1 कोटी
शरीफुल इस्लाम 75 लाख
तंजीम हसन साकीब 75 लाख
मेहदी हसन 75 लाख
नाहिद राणा 75 लाख
रिशाद हुसेन 75 लाख
लिटन दास 75लाख
तौहीद हृदय 75 लाख
हसन महमूद 75 लाख
हेही वाचा-
केन विल्यमसन पुन्हा ठरला नर्व्हस नाईंटीजचा बळी, सचिन तेंडुलकरसह या यादीत टॉप-2 मध्ये सामील
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघात अष्टपैलूचा खेळाडूचा समावेश
IPL 2025: श्रेयस अय्यर कर्णधार तर मधल्या फळीत मॅक्सवेल-स्टॉइनिस, पाहा पंजाब किंग्जची प्लेइंग 11