आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) 2019साठी भारतीय क्रिकेटपटूंची मूळ किंमत विदेशी क्रिकेटपटूंपेक्षा कमी आहे. मागील हंगामात सर्वाधिक महागडा ठरलेला जयदेव उनाडकट या ही हंगामात त्याला भारतीय खेळांडूमध्ये अधिक रक्कम मिळू शकते.
या हंगामात उनाडकटची मूळ किंमत 1.5 कोटी रूपये असून ही भारतीय खेळाडूंमध्ये या हंगामासाठी मिळालेली सर्वात मोठी मुळ किंमत ठरली आहे.
युवराज सिंग, अक्षर पटेल, वृध्दिमान साहा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांना मात्र 1 कोटी एवढीच मूळ किंमत मिळाली असून एकाही भारतीय खेळाडूची मूळ किंमत 2 कोटीच्या आसपास नाही.
तसेच इंग्लंडच्या 20 वर्षीय सॅम करनला 2 कोटी एवढी मूळ किंमत मिळाली आहे. तर लसिथ मलिंगाही या हंगामात खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. तो मागील वर्षी मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये होता. त्यालाही 2 कोटी एवढी मूळ किंमत मिळाली आहे.
करन आणि मलिंगा प्रमाणेच कोरी अॅण्डरसन, अॅंजेलो मॅथ्यूज, कोलीन इंग्राम, ब्रेंडन मॅक्युलम, डॉर्सी शॉर्ट, ख्रिस वोक्स, शॉन मार्श यांनाही 2 कोटी एवढी मूळ किंमत मिळाली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाज डेल स्टेनची मुळ किंमत 1.5 कोटी एवढी आहे.
आयपीएल 2019चा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे होणार आहे. याआधी तो बेंगलुरूला होणार होता. तसेच 2019 मध्ये भारतातील सर्वसाधारण निवडणुका आणि आयपीएलच्या सामन्यांच्या तारखा या समान असण्याची शक्यता असल्याने ते सामने दक्षिण आफ्रिका किंवा अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–चेतेश्वर पुजारा-राहुल द्रविड बाबतीत घडला बाप योगायोग!
–तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम
–कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट