बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालक यांच्यात बुधवारी, 31 जुलै रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये मेगा ऑक्शन ते रिटेन्शन रुल्स यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान, सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन आणि पंजाब किंग्जचा सहमालक नेस वाडिया या बैठकीला उपस्थित होते. काही संघ मालक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते. बीसीसीआयने अधिकृत दुजोरा दिला नसला तरी, या बैठकीत काय झाले आणि कोणत्या निर्णयांवर विचार करण्यात आला ते जाणून घेऊया?
बीसीसीआय आणि संघ मालकांमधील बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयपीएल 2025 मेगा लिलाव आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान आणि सनरायझर्स हैदराबादची सह-मालक काव्या मारन यांनी थेट मेगा लिलावाला विरोध केला आहे. केकेआर आणि हैदराबाद हे आयपीएल 2024 चे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते संघ होते, परंतु आतापर्यंत बीसीसीआयने या संघांच्या मतांवर कोणताही औपचारिक निर्णय दिलेला नाही.
निराशा व्यक्त करताना काव्या म्हणाली – एक मजबूत संघ तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. चर्चा केल्याप्रमाणे, युवा खेळाडूंना परिपक्व करण्यासाठी बराच वेळ घालवावा लागेल. अभिषेक शर्माला कामगिरीत सातत्य आणण्यासाठी 3वर्षे लागली आहेत. तुम्ही सर्वजण माझ्याशी सहमत असाल की इतर संघांमध्येही अशी अनेक उदाहरणे सापडतील.
या बैठकीत रिटेन्शन नियमांबाबत जोरदार चर्चा झाली. एका बातमीत असेही म्हटले आहे की केकेआरचा मालक शाहरुख खान पंजाब किंग्जचा सहमालक नेस वाडिया यांच्याशी रिटेन्शन नियमांवरून भांडला होता. एकीकडे, शाहरुखला सर्व फ्रँचायझींनी अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी द्यावी अशी इच्छा आहे, परंतु नेस वाडियाने कमी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या नियमाचे समर्थन केले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, आयपीएल 2025 मेगा लिलावात संघांना केवळ 3-4 खेळाडूंनाच ठेवण्याची परवानगी असेल. पण अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा-
‘तुझा सध्याचा आवडता क्रिकेटर कोण?’, समोरुन प्रश्न येताच धोनीचे क्षणात उत्तर….
क्रिकेट जगतावर शोककळा! टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन
विराटला श्रीलंकेत बाबर आझमप्रमाणे वागणूक! फॅन्सने असं काही म्हटलं, कोहली संतापला