दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्स मोठ्या काळापर्यंत आयपीएलमध्ये खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि डिविलियर्स यांचे नाते किती किती जवळचे आहे, हे चाहत्यांना चांगले माहीत आहे. आता आयपीएलच्याच धरतीवर दक्षिण आफ्रिकेत देखील एसए20 लीगचे आयोजन केले जाणार आहे. डिविलियर्सच्या मते आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना ज्या पद्धतीने फायदा मिळाला आहे, त्याच पद्धतीने एसए20 लीगमुळे आफ्रिकी खेळाडूंना फायदा मिळेल, असे डिविलियर्सला वाटते. यावेळी त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव सांगितला.
एसए20 (SA20) लीग 2023 च्या जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. एबी डिविलियर्स (Ab De Villiers) याला या टी-20 लीगकडून आयपीएलप्रमाणेच मोठ्या अपेक्षा आहेत. क्रिकेट साउथ अफ्रिकासोबत बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “माझ्या मते एसए20 लीग दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटसाठी खूप योग्य वेळी सुरू होत आहे. आपण पाहिले आहे की, अशा लीग्सने विदेशात काय काम केले आहे. लीगमुळे आपल्या युवा खेळाडूंना जगभरातील सर्वकृष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याचा आणि मोठ्या मंचावऱ खेळण्याची संधी मिळेल.”
मुंबई इंडियन्सच्या मालकिचा संघ एमआय केपटाऊन संघाने डेवाल्ड ब्रेविस () याला करारबद्ध केले आहे. ब्रेविसने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी 19 वर्षांखालील विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्याने स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या शिखर धवनच्या मोठ्या विक्रमाला देखील मोडीत काढले होते. त्यानंतर त्याने आयपीएल आणि सीपीएल सारख्या लीगमध्येही गुणवत्ता दाखवली. डिविलियर्स देखील एसए20 लीगमध्ये ब्रेविसला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.
आयपीएलमुळे त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयी बोलताना डिविलियर्स म्हणाला की, “माझ्या आणि इतर काही खेळाडूंसाठी आयपीएल मोठी संधी होती. आयपीएल सुरू झाल्यामुळे आमचे आयुष्य बदलले. लोकांना क्रिकेटची खूप आवड आहे. ते फक्त स्वतःच्या संघालाच नाही, तर इतर संघांना देखील समर्थन देतात. सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी हीच होती की, वेगवेगळ्या लोकांशी भेटणे. मी ग्लेन मॅकग्राचा विचार करायचो आणि नंतर मला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. ते एवढे मोठे व्यक्त होते आणि अचानक मी त्यांच्यासोबत बसून बीयर शेअर करत होतो. हा अप्रतिम अनुभव होता.” दरम्यान, डिलिवियर्सने सध्या आंतरराष्ट्रीय आणि एयपीएलसारक्या सर्व लीग्समधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, आगामी हंगामासाठी तो आरसीबीच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होऊ शकतो. (IPL changed my life! Big statement from AB de Villiers)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माणूस व्हा रे! रिषभच्या अपघातानंतर कार्तिकची लोकांना कळकळीची विनंती; म्हणाला…
पंतच्या अपघाताविषयी बीसीसीआयची मोठी अपडेट, बोर्ड कुटुंबियांच्या सतत संपर्कात