---Advertisement---

२६ नाही १९ सप्टेंबरपासून होणार आयपीएल, रात्री ८ वाजता नाही तर अशावेळी होणार सामने सुरु

On: बुधवार, जुलै 22, 2020 3:06 PM
---Advertisement---

आयपीएलचा १३वा हंगाम २६ सप्टेंबर ऐवजी १९ सप्टेंबर २०२० पासून सुरु होण्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. स्टार स्पोर्ट्स, जे आयपीएलचे मुख्य प्रसारक आहेत ते आधीच्या वेळापत्रकाने खुश नसल्याने हा बदल करण्यात येणार आहे.

यापुर्वी आयपीएलचे सामने रात्री ८ वाजता सुरु होतं असे. जर एका दिवशी दोन सामने असतील तर एक ४ तर दुसरा ८ वाजता होतं असे. परंतु यामुळे स्टार स्पोर्ट किंवा अन्य प्रसारकांचे मोठे नुकसान होतं असे. यामुळे त्यांनी ८  ऐवजी ७.३०ला सामने सुरु करण्याची विनंती अनेक वेळा केली. आता मात्र बीसीसीआय ही विनंती ऐकू शकते.

आयपीएल गवर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले की भारत देशात आयपीएलचे सामने घेण्यास भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्याने हे सामने युएईमध्ये घेण्यात येतील. यापुर्वी ही स्पर्धा २९ मार्च ते २४ मे २०२० दरम्यान होणार होती. परंतु कोरोना व्हायरसमुळे हे सर्व पुढे ढकलण्यात आलं होतं.

आता टी२० विश्वचषक व आशिया कप रद्द झाल्यामुळे मात्र आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाचा-आयपीएल तर दुबईत न्यायची आहे, परंतू या गोष्टीचं आहे मोठं टेन्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---