आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराशाजनक प्रदर्शन करताना दिसला आहे. रोहितने चालू आयपीएल हंगामात पहिल्या 12 सामन्यांमध्ये अवघ्या 220 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 18.33 राहिली आहे. असे असले तरी, शुक्रवारी (12 मे) रोहितने आपल्या नावावर मोठा विक्रम केला. आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी त्याने 200 षटकार पूर्ण केले आहेत.
शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) संघ आमने सामने होते. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. संपूर्ण हंगामात सुमार प्रदर्शन करणारा रोहित या सामन्यात मात्र आक्रमामक अंदाजात दिसला. सुरुवातीच्या 9 चेंडूंमध्ये रोहितने 21 धावा कुटल्या होत्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार देखील त्याने मारले होते. डावातील आपला पहिला षटकार मारताच रोहितने मुंबई इंडियन्ससाठी 200 षटकार पूर्ण केले. मुंबईसाठी 200 षटकार मारणारा रोहित शर्मा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
223 – कायरन पोलार्ड
201* – रोहित शर्मा
98 – हार्दिक पंड्या
88 – ईशान किशन
81 – सूर्यकुमार यादव
79 – अंबाती रायडू
दरम्यान, चालू आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अपेक्षित होऊ शकली नव्हती. पण मागच्या काही सामन्यांमध्ये खेळाडूंच्या वादळी प्रदर्शनाच्या जोरावर मुंबईने आपली आकडेवारी सुधरवली. हंगामातील सुरुवातीच्या 11 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळाला आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात येण्यापूर्वी गुणतालिकेत मुंबईचे स्थान चौथे होते. (IPL design for Rohit Sharma to complete 200 Sixes for Mumbai Indians.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यशस्वीसह ‘या’ चार भारतीय फलंदाजांनी 21व्या वयात IPLमध्ये ठोकलंय शतक, एकाला म्हटले जाते भारताचा फ्यूचर कॅप्टन
ऑरेंज कॅपसाठी युवा अन् अनुभवी खेळाडूमध्ये काट्याची टक्कर! ‘या’ फलंदाजांमध्ये फक्त 1 धावेचे अंतर