आयपीएलच्या १३ व्या हंगामात एमएस धोनीला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. अशामध्ये म्हटले जात आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमध्येही धोनीची कारकीर्द जवळपास संपली आहे. एक हंगाम खराब गेल्यामुळे काही बदलणार नसल्याचे चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी म्हटले.
विश्वनाथन यांनी २०२१ मध्येही धोनीच चेन्नईचे नेतृत्त्व करणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “आम्हाला पूर्ण आशा आहे की, पुढील हंगामात धोनी चेन्नईचे नेतृत्त्व करेल. धोनीने तीन वेळा चेन्नईला आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. केवळ एका हंगामात खराब कामगिरी केल्याने सर्वकाही बदलणार नाही.”
विश्वनाथन यांनी सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे संघाचा भाग नसणे हेदेखील संघाच्या खराब कामगिरीचे एक कारण सांगितले. त्यांचे असे मत आहे की, रैना आणि हरभजनच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी बाहेर पडल्यामुळे संघाचे संतुलन बिघडले.
विश्वनाथन यांनी म्हटले, “चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामात आपल्या क्षमतेनुसार खेळू शकला नाही. आम्हाला अधिक सामन्यांमध्ये विजय मिळवायला पाहिजे होता. परंतु आमच्या संघाचे संतुलन खूप खराब राहिले.”
धोनीने संकेत दिले आहेत की, तो चेन्नईच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये नक्कीच भाग घेईल. परंतु ज्याप्रकारे धोनी प्रत्येक सामन्यानंतर युवा खेळाडूंना आपला टी शर्ट आणि ऑटोग्राफ देत आहे, ते पाहून धोनी आयपीएलला राम राम ठोकणार की काय असे तर्क वितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे