मुंबई । राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांच्या सलग दोन कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरु होण्याच्या आधी ते त्याच्या संघात सामील होतील. कोरोनाची लागण झाल्याने प्रशिक्षक दिशांत याग्निक हे संघासमवेत दुबईला गेले नव्हते.
राजस्थान रॉयल्स संघ दुबईला जाण्यापूर्वी 37 वर्षीय याग्निक यांना 12 ऑगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. उदयपुर येथे त्यांच्या घरी असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनंतर ते 14 दिवस रुग्णालयात दाखल होते.
पण आता ते कोरोना मुक्त होऊन दुबईमध्ये संघात सामील होण्यासाठी पोहचले आहेत. राजस्थान रॉयल्सने याग्निक यांच्याबद्दल ट्विट केले आहे की, “चौदा दिवसांचा क्वारंटाइन, दोन निगेटिव टेस्ट, एक फिटनेस टेस्ट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक आयपीएलसाठी तयार!”
14-day quarantine ✅
2 Negative tests ✅
1 Fitness test ✅Fielding coach @Dishantyagnik77 is ready for #IPL2020 👍#HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/bKs5Oqp6YF
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 28, 2020
राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकार्याने म्हटले आहे की, “दिशांत सकाळी येथे पोहोचले आहे.”
तथापि, ते आता सहा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहतील. त्यांच्या पुन्हा कोरोना टेस्ट होतील. त्यात निगेटिव्ह आल्यानंतर ते संघाच्या प्रशिक्षणात सामील होतील.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएल अबुधाबी, शाहजाह आणि दुबई या तीन शहरांमध्ये खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…
मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी
पाकिस्तान क्रिकेटरच्या चुकीमुळे संघ संकटात, मोडला आयसीसीचा मोठा नियम
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने
आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा