---Advertisement---

भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…

---Advertisement---

१९ सप्टेंबरपासून जगातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२०ची सुरुवात होणार आहे. आयपीएल इतिहासात आजवर एकदाही विजेतेपद न पटकावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा संघ यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या पूर्ण तयारीत असेल. भारतीय संघातील दमदार खेळाडूंनी भरलेल्या आरसीबी संघात अनेक दमदार परदेशी खेळाडूही आहेत.

अशात, भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने ४ परदेशी खेळाडूंची निवड केली आहे, जे आयपीएलच्या तेराव्या हंगामात आरसीबी संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असायला पाहिजेत. These 4 Players Should Be The Part Of Royal Challengers Bangalore Playing XI

आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना चाप्राने या खेळाडूंची निवड केली. चोप्रा म्हणाला की, “ऍरॉन फिंच, एबी डिविलियर्स, मोईन अली आणि ख्रिस मॉरिस हे परदेशी खेळाडू आयपीएल २०२० मधील आरसीबी संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असायला पाहिजेत. आरसीबीकडून फलंदाजी करण्यासाठी या हंगामात डिविलियर्ससोबत फिंचलाही संधी मिळायला पाहिजे. तो सलामीला दमदार फलंदाजी करु शकतो.”

“आरसीबीकडे फिरकी गोलंदाजीसाठी बऱ्याच दमदार भारतीय फिरकीपटूंचे पर्याय उपलब्ध आहेत. तर, बरेच शानदार भारतीय वेगवान गोलंदाजही संघात उपलब्ध आहेत. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली हा देखील एक शानदार फिरकीपटू आहे. तर, वेगवान गोलंदाजीसाठी ख्रिस मॉरिस हा उत्कृष्ट खेळाडू उपलब्ध आहे,” असे पुढे बोलताना चोप्रा म्हणाला.

आरसीबीच्या फलंदाजी फळीचीही चोप्राने खूप प्रशंसा केली. “जर तुम्ही आरसीबीचे चाहते असाल तर मी असे म्हणेल की, फिंचला या हंगामातील सर्व सामन्यात संधी मिळायला पाहिजे. त्याच्यासोबत पार्थिव पटेल किंवा देवदत्त पडिक्कल या फलंदाजांना तुम्ही खेळवू शकता. परंतु, पार्थिव आणि पडिक्कल या दोघांपैकी एकाला तुम्हाला निवडावे लागेल,” असे शेवटी बोलताना चोप्राने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे १७ जणांचा न्यूझीलंड संघ; या २ खेळाडूंचे झाले पुनरागमन

६०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनच्या यशाचे हे आहे रहस्य

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता

आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---