जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग चाहत्यांमध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. या स्पर्धेच्या 16वा हंगामासाठी आता जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्व संघ कोणत्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कोणाला लिलावात रिलीझ करायचे, याचा विचार करत आहेत. आयपीएल 2022मध्ये 14 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर पाचव्या क्रमांकावर राहणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांच्या 15 खेळाडूंची यादी तयार करण्यामध्ये व्यस्त आहे. सर्व संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयकडे ही यादी पाठवायची आहे. चला तर जाणून घेऊया लिलावापूर्वी दिल्ली संघ कोणत्या खेळाडूंना रिलीझ करू शकतो.
1. शार्दुल ठाकूर
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या लिलावापूर्वी रिलीझ केले जाऊ शकते. दिल्लीने शार्दुलला आयपीएल 2022मध्ये मेगा लिलावात 10.75 कोटी रुपयांच्या किंमतीत संघात सामील केले होते. त्याने मागील वर्षी दिल्लीसाठी एकूण 14 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट हा 9.79 इतका होता.
2. टीम सेफर्ट
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टीम सेफर्ट (Tim Seifert) याला दिल्लीने मागच्या मेगा लिलावात 50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले होते. त्याने 2022च्या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी एकूण 2 सामने खेळले होते. यामध्ये त्याने 12च्या सरासरीने 24 धावा केल्या होत्या. यावेळी दिल्ली त्याला संघातून रिलीझ करू शकते.
3. कमलेश नागरकोटी
फक्त 40 लाखांची मूळ किंमत असणाऱ्या कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) याला दिल्लीने मेगा लिलावात 1.10 कोटी रुपयांच्या किंमतीत खरेदी केले होते. नागरकोटीने 2022मध्ये दिल्लीकडून फक्त 1 सामना खेळला होता. यामध्ये त्याने 14.50च्या सरासरीने धावा केल्या होत्या. कदाचित दिल्ली संघ यावेळी नागरकोटीला रिलीझ करू शकतो.
4. मनदीप सिंग
फलंदाज मनदीप सिंग (Mandeep Singh) याला दिल्ली कॅपिटल्सने 2022च्या मेगा लिलावात 1.10 कोटी रुपयांच्या किंमतीत ताफ्यात सामील केले होते. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. मनदीपने आयपीएल 2022मध्ये दिल्लीसाठी एकूण 3 सामने खेळले, त्यात त्याने फक्त 18 धावा चोपल्या. त्याच्या या प्रदर्शनामुळे दिल्ली संघ त्याला आयपीएल 2023मध्ये रिलीझ करू शकतो.
5. केएस भरत
अवघ्या 20 लाखांच्या मूळ किंमतीचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) याला दिल्ली कॅपिटल्स संघाने 2 कोटी रुपयांना ताफ्यात सामील केले होते. त्याने 2022मध्ये दिल्लीकडून फक्त 2 सामने खेळले होते. यामध्ये फलंदाजी करताना त्याने फक्त 4च्या सरासरीने 8 धावा चोपल्या होत्या. कदाचित त्याच्या कामगिरीमुळे दिल्ली संघ त्याला रिलीझ करू शकतो.
6. रिपल पटेल
अष्टपैलू रिपल पटेल (Ripal Patel) याला दिल्ली कॅपिटल्स संघाने 2022च्या मेगा लिलावात 20 लाखांच्या मूळ किंमतीत ताफ्यात सामील केले होते. त्याने 2022मध्ये दिल्लीसाठी 2 सामने खेळले होते. यामध्ये त्याने फक्त 6 धावा चोपल्या होत्या. त्यामुळे कदाचित दिल्ली संघ त्याला यावर्षी रिलीझ करण्याचा विचार करत असावा.
7. चेतन सकारिया
चेतन सकारिया (Chetan Sakariya) याला दिल्ली कॅपिटल्स संघाने मेगा लिलावात 4.20 कोटी रुपयांच्या किंमतीत खरेदी केले होते. विशेष म्हणजे, त्याची मूळ किंमत ही 50 लाख रुपये होती. चेतनने 2022मध्ये दिल्लीसाठी एकूण 3 सामने खेळले, ज्यात त्याने 28च्या सरासरीने 3 विकेट्स चटकावल्या होत्या. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट हा 7.64 इतका होता.
अशात दिल्ली कॅपिटल्स संघ लिलावात कोणत्या खेळाडूला रिलीझ करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Ipl franchise delhi capitals may release these players before ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिविलियर्सला गली क्रिकेट खेळताना पाहिलंय का? नसेल, तर ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच
दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत