2025च्या आयपीएल (Indian Premier League) मेगा लिलावाची क्रिकेटचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण मेगा लिलावापूर्वी भारतीय नियामक मडळाने (BCCI) जाहीर केलेल्या रिटेंशन यादीमुळे लिलावाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आता दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Captitals) कायम ठेवलेल्या खेळाडूंबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. रिषभ पंत (Rishabh Pant), अक्षर पटेल (Axar Patel) या स्टार खेळाडूंना दिल्लीने कायम ठेवल्याचे वक्तव्य केले आहे. पण ही फ्रँचायझी ऑस्ट्रेलियाच्या एका युवा खेळाडूवरआपली नजर ठेवण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या (PTI) रिपोर्ट्सनुसार आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले की, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) पंतला 18 कोटींमध्ये, अक्षरला 14 कोटींमध्ये आणि कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) 11 कोटींमध्ये कायम ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा 22 वर्षीय विस्फोटक खेळाडू ‘जेक फ्रेजर मॅकगर्क’ला (Jake Fraser-McGurk) दिल्ली व्यवस्थापन मॅकगर्कवर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची शक्यता आहे.
जेक फ्रेजर मॅकगर्कने (Jake Fraser-McGurk) 2024च्या आयपीएलमध्ये 36.67च्या सरासरीने 330 धावा केल्या. तो आपल्या स्ट्राइक रेटमुळे सर्वाधिक चर्चेत होता. शेवटच्या हंगामात त्याने सुमारे 234च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने धावा केल्या, तर एकूण 28 षटकारही ठोकले. एवढंच नाही, तर त्याने शेवटच्या हंगामात एकदा नव्हे तर 2 वेळा 15 चेंडूत तुफानी अर्धशतकी खेळी केली होती.
शेवटच्या आयपीएल हंगामानंतर मॅकगर्कने यंदाच्या वर्षीच ऑस्ट्रेलियासाठी टी20 मध्ये पदार्पण केले, परंतु आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी त्याने 4 टी20 सामन्यात 66 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 2 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 51 धावा आहेत. मॅकगर्कची खेळण्याची शैली अतिशय आक्रमक आहे. त्याच्या खेळण्याच्या आक्रमक अंदाजामुळे तो कोणत्याही संघासाठी फायदेशीर खेळाडू ठरू शकतो.
हेही वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या यादीत, भारताच्या युवा खेळाडूचा समावेश!
रोहित शर्मानंतर कोण होणार पुढील कर्णधार? हिटमॅननं स्वत: दिले संकेत
दिनेश कार्तिक पुन्हा करणार चौकार-षटकारांची आतषबाजी! नव्या लीगशी करार, राशिद खानचाही संघात समावेश