---Advertisement---

एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! Rohit Sharmaच्या चाहत्यांनी उचललं धक्कादायक पाऊल, मुंबईचं मोठं नुकसान

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 11:30 AM
Rohit-Sharma-IPL
---Advertisement---

Mumbai Indians Followers: 19 डिसेंबर रोजी इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. पहिल्यांदाच हा आयपीएल 2024 लिलाव परदेशात आयोजित केला जात आहे. हा लिलाव दुबईत आयोजित केला जाणार आहे. मात्र, या लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्स संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना आता मोठा फटका बसला आहे.

रोहितला काढून हार्दिकला बनवले कर्णधार
पाच वेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) कठोर निर्णय घेतला. त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवले आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघाचा नवीन कर्णधार बनवले. अशात चाहत्यांकडून मुंबई इंडियन्स संघावर चोहोबाजूंनी टीकास्त्र डागले जात आहे.

मुंबईचे मोठे नुकसान
खरं तर, मुंबईला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवताच चाहत्यांनीही मुंबईची साथ सोडली आहे. मुंबई इंडियन्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटला तब्बल 3 लाखांहून अधिक चाहत्यांनी अनफॉलो केले आहे. एकीकडे, जेव्हा रोहित शर्मा कर्णधार होता, तेव्हा संघाचे फॉलोव्हर्स 13.2 मिलियन होते. मात्र, हार्दिकला कर्णधार बनवताच संघाच्या फॉलोव्हर्सची संख्या 12.9 मिलियन झाले आहेत.

https://twitter.com/BrokenCricket/status/1735892561276072125

चाहत्यांचा विरोध
अशात चाहत्यांनी रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा पूर्णपणे विरोध केला आहे. चाहत्यांनी यावर पूर्णपणे माजी कर्णधार रोहित शर्माला पाठिंबा दिला आहे. तसेच, संघाला अनफॉलो करण्याची मोहीम चालवली आहे. यासोबतच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची बातमी समोर येताच, संघ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ट्रेंड होत आहे.

रोहितला दिला पाठिंबा
दुसरीकडे, आयपीएल 2024, कर्णधारपद, हिटमॅन, शेम ऑन एमआय आणि अंबानी यांसारख्या शब्दांचाही वापर सातत्याने काल रात्रीपासून ट्रेंड होत आहे. चाहते वेगवेगळ्या पोस्ट आणि कमेंट्स करत आपला राग व्यक्त करत आहेत. काहींनी तर मुंबईची जर्सी आणि टोपीही जाळली आहे. यावरून दिसते की, रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय मुंबईला किती महागात पडत आहे. (ipl franchise mumbai indians lose more than 3 lakh followers on instagram after remove rohit sharma as captain)

हेही वाचा-
टीम इंडियाबाबत धक्कादायक BREAKING! एकाने स्वत: काढून घेतलं नाव, तर दुसरा कसोटी मालिकेतून बाहेर; लगेच वाचा
धक्कादायक! रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते Out of Control, जाळून टाकली मुंबईची टोपी अन् जर्सी- Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---