क्रिकेटमध्ये खेळाडू अनेकदा विक्रम रचतात, परंतु कधीकधी त्यांना माहितीच नसते की, त्यांच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. असेच काहीसे ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत पाहायला मिळाले. हा कारनामा आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या नेथन एलिस याने बीबीएलमधील एका सामन्यात करून दाखवला. चला तर जाणून घेऊया नेथन एलिसने कोणता विक्रम नावावर केला आहे.
बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेतील 42वा सामना होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी थंडर (Hobart Hurricanes vs Sydney Thunder) संघात पार पडला. याच सामन्यात हरिकेन्स संघाकडून खेळताना नेथन एलिस (Nathan Ellis) याने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. एलिसने 10 षटकांनंतर हॅट्रिक पूर्ण केली. त्यामुळे, त्याला आणि संघ सहकाऱ्यांनाही समजले नाही की, नेथन एलिसची हॅट्रिक पूर्ण झाली आहे.
BOWLED HIM! NATHAN ELLIS HAS A HAT-TRICK! #BBL12 pic.twitter.com/KeRJGy7fne
— KFC Big Bash League (@BBL) January 15, 2023
होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) संघाचा वेगवान गोलंदाज नेथन एलिस याने पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर सिडनी थंडर (Sydney Thunder) संघाचा सलामीवीर मॅट गिलक्स याला बाद केले. त्यानंतर त्याने त्याच्या पुढील दोन्ही चेंडूत ऑलिव्हर डेव्हिस आणि नेथन मॅकएँड्र्यू यांना तंबूत धाडले. मात्र, या दोन्ही विकेट्स त्याला 10 षटकानंतर म्हणजेच सिडनीच्या डावाच्या 14व्या षटकात मिळाल्या. त्यामुळे नेथनने हॅट्रिक पूर्ण करूनही जल्लोष केला नाही. समालोचन करणाऱ्या ब्रेट ली (Brett Lee) यानेही म्हटले की, “त्याने हॅट्रिक पूर्ण केल्याचे त्याला माहिती आहे का? याबाबत मला कल्पना नाही.”
NATHAN ELLIS TAKES A HAT-TRICK!
But it was over multiple overs… did he know? #OhWhatAFeeling @Toyota_Aus | #BBL12 pic.twitter.com/HCFHCR9XP2
— cricket.com.au (@cricketcomau) January 15, 2023
नेथन हा बिग बॅश लीगच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा नववा गोलंदाज बनला. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना एकूण 27 धावा देत 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. एलिसच्या दमदार गोलंदाजीमुळे सिडनी थंडरला 20 षटकात 135 धावाच करता आल्या. थंडरकडून ऑलिव्हर डेविस याने सर्वाधिक 45 धावा केल्या. दुसरीकडे, हरिकेन्सकडून नेथनव्यतिरिक्त पॅट्रिक डूलीने 3 विकेट्स घेतल्या.
थंडरचे 136 धावांचे आव्हान हरिकेन्सने 16.1 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. हरिकेन्सकडून टीम डेविड याने सर्वाधिक नाबाद 76 धावा कुटल्या. या धावा त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने चोपल्या. (ipl franchise punjab kings pacer nathan ellis takes hattrick but does not realise)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण आहे तो भारतीय धुरंधर ज्याने उडवलीये फाफ डू प्लेसिसची रात्रीची झोप? माजी कर्णधारानेच केलाय खुलासा
बोर्डाच्या परिक्षेमुळे मुकणार होती टीम इंडियात एंट्री; आता वर्ल्ड कपमध्ये कुटल्या 161च्या स्ट्राईट रेटने धावा