---Advertisement---

भारत- पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 गोष्टींवर असेल आख्ख्या जगाचं लक्ष, जाणून घ्या एका क्लिकवर

IND-vs-Pak-Win-Moment
---Advertisement---

क्रिकेटप्रेमी टी20 विश्वचषक 2022मधील सर्वच सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातही सर्वात महत्त्वाचा सामना जर कोणता असेल, तर तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. जेव्हाही भारत- पाकिस्तान संघात सामना असतो, तेव्हा फक्त या दोन देशातील क्रिकेटप्रेमीच नाहीत, तर जगातील अनेक महत्त्वाच्या देशातील क्रिकेटप्रेमी सामना पाहतात. आता टी20 विश्वचषक 2022मध्ये हे दोनही देश 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) या सामन्यासाठी जवळपास 1 लाखांहून अधिक चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित असतील. हा सामना कोणत्याही अंतिम सामन्यापेक्षा कमी महत्त्वाचा नाहीये. या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू आहेत. अशात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने सांगितले आहे की, या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यात कोणत्या 5 गोष्टी पाहण्यासारख्या असतील. चला तर त्या 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

भारत-पाकिस्तान सामन्यातील 5 महत्त्वाच्या गोष्टी
सनरायझर्स हैदराबाद यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी पहिली महत्त्वाची गोष्ट सांगताना म्हटले की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक लक्ष विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांच्यावर असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट भुवनेश्वर कुमार विरुद्ध मोहम्मद रिझवान असतील. आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या तिसऱ्या फोटोत सांगितले की, दोन्ही संघांच्या फिरकीपटूंच्या प्रभावावरही सर्वांचे लक्ष असेल. भारताकडे युझवेंद्र चहल आणि पाकिस्तानकडे शादाब खान यांसारखे फिरकीपटू आहेत.

हैदराबादने चौथ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगताना पॉवर हिटर्स यांच्यातील संघर्षावर लक्ष असल्याचे सांगितले. कारण, पाकिस्तानकडे हैदर अली आणि मोहम्मद नवाज आहेत, तर दुसरीकडे भारताकडे दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या आहेत. तसेच, शेवटी हैदराबादने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तान कर्णधार बाबर आझम यांना ठेवले आहे. तसेच, त्यांनी या दोघांबद्दल सांगताना म्हटले की, या सामन्यात कर्णधारांच्या रणनीतीवरही सर्वांचे लक्ष असेल.

आता 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यामध्ये कोणाला यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता 30 टक्केच!”
इंग्लंड संघासाठी मोठा झटका, प्रमुख वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषकातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---