आयपीएलचा १४ वा हंगाम कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये या हंगामातील राहिलेले सामने खेळले जाणार आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधर श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. याच पार्श्वभूमीवर हंगामाच्या सुरुवातीपासून दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंतने केले होते. त्यानंतर आता श्रेयस अय्यर फिट झाला असून हंगामाच्या दुसऱ्या सत्रात संघाचा कर्णधार कोण असेल? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंतच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने भारतातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पहिल्या टप्प्यानंतर संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे पंतच पुढेही संघाचा कर्णधार राहणे जवळजवळ निश्चित आहे. संघ व्यवस्थापनही याच मताशी सहमत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान अशी माहिती मिळाली आहे की, फ्रेंचायझी प्रमोटर किरण कुमार ग्रंथी आणि पर्थ जिंदल यांच्यात कर्णधाराच्या मुद्द्यावर एकमत आहे. अय्यरने मार्चनंतर कोणताही प्रतिस्पर्धी सामना खेळलेला नाही. अशात संघ व्यवस्थापन अय्यरबाबत कसलीही जोखीम होऊ इच्छित नाही. जिंदलने यावर कसलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, किरणने याबाबत बोलताना सांगितले की, यविषयी घोषणा तेव्हाच केली जाईल, जेव्हा प्रशिक्षकांसहीत संघाचे सर्व सदस्य दुबईमध्ये एकत्र येतील.
बोर्डाच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, “मागच्या आठवड्यात प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काही प्रोमो शूट केले आहेत. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यादरण्यान ही शूटिंग केली गेली. कारण आयपीएलमधील कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, आणि रिषभ पंत यावेळी इंग्लंडमध्ये आहेत.”
Can we get a VAR check for @sambillings? 😋
Be ready for this man to fill your feed with a lot more cricket and entertainment in a couple weeks 🤩#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCAllAccess @OctaFX pic.twitter.com/SIsSOMlyXP
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 3, 2021
श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्हा सामील
आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरने स्पर्धेतून माघार घेतली होती. तो आता पाच महिन्यांनी फिट झाला असून स्पर्धेत परतणार आहे. अय्यर याबाबत म्हणाला, “ईमानदारीने सांगायचे तर मला जगात सर्वात वरती असल्यासारखे वाटत आहे. ही ती गोष्ट होती, ज्याची मी आतुरतेना वाट पाहत होतो. तसेही संघासोबत असल्यावर वाईट वाटत नाही. मी संघाच्या सराव सत्राच्या सहा दिवस आधी युएईत आलो होतो आणि यूएई संघाविरुद्धचे मी खेळलेले दोन सामने चांगले होते. त्यामुळे मी त्याच लयात पुढे खेळू इच्छित आहे.”
अय्यर पुढे बोलताना म्हणाला, “बाहेर बसून आपल्या सहकाऱ्यांना खेळताना पाहणे खूप कठीण होते. मी टीव्हीसमोर बसलो होतो, प्रत्येक सामना पाहत होतो आणि असे वाटत होते की मी मैदानावर आहे आणि माझ्या जागेवर दिसणाऱ्या चित्राचे अनुकरण करत होतो. मात्र, ही आता भूतकाळातील गोष्ट आहे. मला याबाबत विसरावे लागेल आणि हीच लय कायम ठेवावी लागेल, जी संघने हंगामाच्या पहिल्या टप्प्यात कायम ठेवली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
सलामी जोडीच्या अभेद्य भागिदारीनंतरही भारताचा मार्ग खडतर, विजयासाठी २५०ची आघाडीही अपुरी!
उमेश यादवचा पुनरागमनात धमाका, जो रूटच्या महत्त्वपूर्ण विकेटवर दिली मन जिंकणारी प्रतिक्रिया