Ishan Kishan : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला त्याचं नाव संघात नव्हतं, मात्र तो अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आणि त्यानं दमदार शतक ठोकलं! इशान किशनने दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत क संघाकडून खेळताना खणखणीत शतक ठोकले. त्याच्या या शतकी खेळीनंतर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इडियन्सने त्याच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
इशान किशन दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र भारत ब विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो संघात आला आणि त्यानं दमदार शतक झळकावलं. इशान या सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. संघात अभिषेक पोरेल यष्टिरक्षक म्हणून खेळतोय. इशान किशननं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक ठोकलं. त्यानं 120 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 111 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीनंतर मुंबई इंडियन्स आगामी आयपीएल हंगामासाठी त्याला रिटेन करू शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
त्याचे झाले असे की, इशानच्या शतकी खेळीचं कौतुक करताना मुंबई इंडियन्सने इशानचा फोटो शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “14 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार. ‘ट्रेडमार्क ईशान’.” मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
1️⃣4️⃣ cracking fours, 3️⃣ massive sixers. 𝐓𝐑𝐀𝐃𝐄𝐌𝐀𝐑𝐊 𝚰𝐒𝐇𝐀𝐍🔝#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ishankishan51 pic.twitter.com/RyobESsAa8
— Mumbai Indians (@mipaltan) September 12, 2024
दरम्यान इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी अनेक प्रसंगी मॅच विनिंग कामगिरी केली आहे. इशान सध्या चांगल्या लयीत आहे. त्यामुळे संघ त्याला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची रिलीझ आणि रिटेन्शन यादी प्रसिद्ध केली जाईल. इशानचा फॉर्म पाहता मुंबई संघ इशानला कायम ठेवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
आधी मार खाल्ला, मग वचपा काढला; दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान आणि अर्शदीपमध्ये खडाजंगी
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!