दुलिप ट्रॉफी 2024 मध्ये भारत अ आणि भारत ड यांच्यातील सामना अनंतपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत अ ला पहिल्या सामन्यात भारत ब कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करूनही मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील संघ विशेष काही करू शकला नाही. त्यांच्या एकामागून एक विकेट पडल्या. युवा फलंदाज रियान परागची बॅट मात्र नक्की बोलली. मात्र, एक छोटी खेळी करून तोही बाद झाला.
रियान भारत ड विरुद्ध चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 100 च्या वरच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. रियानने 127.59 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 29 चेंडूत 37 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकारही लगावला. रियान मोठी खेळी खेळू शकेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला बाद केले.
अर्शदीप भारताकडून वनडे आणि टी20 खेळतो. तो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ड संघाकडून खेळत आहे. भारत अ संघाविरुद्ध त्याने आतापर्यंत पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली आहे. सिंगने पहिल्या दिवशी 18 षटके टाकली आहेत. ज्यात त्याने 73 धावांत 2 बळी घेतले आहेत. रियानशिवाय अर्शदीपने कुमार कुशाग्रालाही बाद केले.
I.C.Y.M.I
That shot by Riyan Parag 👌 👌
It was the first 6️⃣ of India A’s innings
Riyan Parag hit a counter-attacking 37(29) before being dismissed by Arshdeep Singh.#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️: https://t.co/m9YW0Hu10f pic.twitter.com/6Fq1ShYMeY
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 12, 2024
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत अ संघाने आतापर्यंत पहिल्या दिवशी 68 गडी गमावून 288 धावा केल्या. शम्स मुलानी याने संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक नाबाद 88 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. भारत ड कडून हर्षित राणा, विद्वत कविरप्पा आणि अर्शदीप सिंग यांनी 2-2 बळी घेतले.
हेही वाचा –
INDvsBAN : कानपूरमध्ये कसोटी आयोजित करण्यावरुन बीसीसीआयला धमकी, बदलणार दुसऱ्या सामन्याचे ठिकाण?
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!
बीसीसीआयनं ज्याला बाहेर केलं, त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं! टीकाकारांना सडेतोड उत्तर