खेळाच्या इतिहासात असे खेळाडू क्वचितच घडतात, ज्यांचे वडील एका देशाकडून खेळले तर मुलगा दुसऱ्या देशाकडून खेळला. क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू घडले आहेत, ज्यांचा जन्म एका देशात झाला, तर त्यांनी क्रिकेट दुसऱ्या देशासाठी खेळलं. इंग्लंडचा गोलंदाजी अष्टपैलू ब्रायडन कार्स अशा काही खेळाडूंपैकीच एक.
ब्रायडन कार्सचे वडील झिम्बाब्वेसाठी क्रिकेट खेळले. तर त्यांचा मुलगा इंग्लंडकडून खेळत आहे. विशेष म्हणजे, ब्रायडनचा जन्म दक्षिण आफ्रिकेत म्हणजे तिसऱ्याच देशात झालाय! ब्रायडन आता इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या मालिकेसाठी आपला 17 सदस्यीय कसोटी संघ जाहीर केला. यामध्ये कार्सला प्रथमच स्थान मिळालंय.
29 वर्षीय ब्रायडन कार्स हा उजव्या हातानं वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. त्यानं यापूर्वीच इंग्लंडकडून एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये पदार्पण केलंय. ब्रायडॉनचे वडील जेम्स कार्स यांचा जन्म 13 डिसेंबर 1958 रोजी झिम्बाब्वेच्या हरारे येथे झाला. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही, मात्र ते झिम्बाब्वेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. याशिवाय जेम्स इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळले आहेत. 2019 मध्ये जेम्स यांना इंग्लंडचं नागरिकत्व मिळालं.
इंग्लंडचा संघ येत्या काही दिवसांत कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे 7 ऑक्टोबरपासून तर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना अनुक्रमे 15 आणि 24 ऑक्टोबरपासून कराची व रावळपिंडी येथे खेळला जाईल.
ब्रायडन कार्स यानं जुलै 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानं 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावे 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 विकेट आहेत. ब्रायडननं वनडेमध्ये 155 धावा केल्या आहेत. 48 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 127 विकेट्ससह 1573 धावा आहेत.
हेही वाचा –
बीसीसीआयनं ज्याला बाहेर केलं, त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं! टीकाकारांना सडेतोड उत्तर
मोहम्मद शमी पत्नीला पोटगी म्हणून महिन्याला किती रुपये देतो? आकडा धक्कादायक!
कसोटीमध्ये टी20 स्टाईल फलंदाजी, आयपीएल गाजवणारा खेळाडू दुलीप ट्रॉफीत पुन्हा एकदा फ्लॉप