---Advertisement---

युवीने ज्याचे कौतुक केले त्याच खेळाडूच्या जागी युवीला मिळणार केकेआरमध्ये संधी

On: बुधवार, नोव्हेंबर 20, 2019 6:58 PM
---Advertisement---

आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020 Season) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (IPL13th Season) असणार आहे. 19 डिसेंबर 2019रोजी कोलकाता येथे या हंगामासाठीचा लिलाव होणार आहे. या लिलावात शेकडो खेळाडूंचा समावेश असेल.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) फ्रँचायझी भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगवर (Yuvraj Singh) बोली लावेल, असे केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर (Venky Mysore) यांनी सांगितले आहे.

आयपीएलच्या 8 संघांनी आपल्या काही खेळाडूंना कायम केले तर काही खेळाडूंना लिलावासाठी  मुक्त केले होते. यामध्ये केकेआरने ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट फलंदाज ख्रिस लिनला संघातून काढून टाकले आहे.

अबू धाबी टी10 लीगमध्ये (Abu Dhabi T10 League) मराठा अरेबियन्स (Maratha Arabians) टीमकडून खेळत असलेल्या ख्रिस लिनबरोबर (Chris Lynn) युवराज सिंग खेळत आहे. यावेळी एका डावातील लिनच्या तुफानी 91 धावांनंतर युवराजने सांगितले की ख्रिस लिनला संघातून काढून केकेआरने मोठी चूक केली आहे.

“युवराज सिंग, आम्ही ख्रिस लिनला काढले आहे. जेणेकरून आम्ही लिलावात आपल्यासाठी बोली लावू शकतो. आम्हाला तुम्ही दोघं चॅम्पियन्स आम्हाला आवडता आणि आम्ही तुमचा आदर करतो,” असे वेंकी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) युवराज सिंगला करारातून मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत युवराज पुन्हा लिलावात सामील होऊ शकेल.परंतु युवराजवर कोण बोली लावणार याबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. युवराजने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

युवराज जगातील वेगवेगळ्या टी20 आणि टी10 लीगमध्ये भाग घेत असल्याने तो या लीगमध्ये खेळू शकेल की नाही हे बीसीसीआयवर अवलंबून आहे.

कोलकाता येथे 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या पुढील हंगामासाठी लिलाव होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---