पुणे। गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात शनिवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) दहावा सामना रंगणार आहे. शनिवारी आयपीएलच्या १५ व्या हंगामातील डबल हेडर खेळवला जाणार असून यातील गुजरात आणि दिल्ली संघात होणारा दुसरा सामना असेल.
गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात (Gujarat Titans vs Delhi Capitals) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे (MCA Stadium, Pune) येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
असा असू शकतो गुजरात टायटन्सचा संभावित संघ
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वातील गुजरात टायटन्स आयपीएल स्पर्धेत यंदा नव्याने दाखल झाला आहे. असे असले तरी, त्यांनी या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. आता त्यांना दुसरा सामना दिल्लीविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या (Gujarat Titans Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास संघात बरेच अष्टपैलू आहेत. त्यामुळे मधल्या फळीत बऱ्यापैकी अष्टपैलू खेळाडूच खेळताना दिसू शकतात. यात कर्णधार हार्दिकसह डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, विजय शंकर यांचा समावेश आहे.
तसेच सलामीला गुजरातकडून युवा शुबमन गिलसह यष्टीरक्षक मॅथ्यू वेड उतरू शकतो. तर गोलंदाजीची जबाबदारी अष्टपैलू खेळाडूंशिवाय अनुभवी राशिद खानसह, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि वरुण ऍरॉन यांच्यावर असू शकते.
गुजरात टायटन्स संभावित संघ – शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, विजय शंकर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि वरुण ऍरॉन.
असा असू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ
गेल्या ३ हंगामांपासून शानदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने १५ व्या हंगामाचीही सुरुवात शानदार केली. पहिल्या विजयानंतर आता दिल्ली गुजरातविरुद्ध आत्मविश्वासाने उतरतील. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संभावित ११ जणांच्या (Delhi Capitals Predicted XI) संघाचा विचार करायचा झाल्यास टीम सिफर्ट आणि पृथ्वी शॉ डावाची सुरुवात करू शकतात. तसेच मधल्या फळीत यष्टीरक्षक आणि कर्णधार रिषभ पंतसह (Rishabh Pant) मनदीप सिंग, रोवमन पॉवेल असतील.
अष्टपैलू म्हणून ललित यादव आणि अक्षर पटेल यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजी फळीत शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रेहमान, कुलदीप यादव आणि खलील अहमद यांच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.
दिल्ली कॅपिटल्स संभावित संघ – टीम सिफर्ट, पृथ्वी शॉ, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रेहमान, कुलदीप यादव आणि खलील अहमद.
अशी असू शकते ड्रीम ११
गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC) संघातील ड्रीम ११ बद्दल (Dream XI) बोलायचे झाल्यास यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि मॅथ्यू वेडला संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीमध्ये पृथ्वी शॉ, टीम सिफर्ट, शुबमन गिल, डेव्हिड मिलर हे चांगली कामगिरी करू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्यासह राहुल तेवतियाला संधी दिली जाऊ शकते. तर गोलंदाजीत कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमीवर विश्वास दाखवला जाऊ शकतो. तसेच अक्षर पटेलला कर्णधार आणि राहुल तेवातियाला उपकर्णधार केले जाऊ शकते.
कर्णधार – अक्षर पटेल
उपकर्णधार – राहुल तेवतिया
यष्टीरक्षक – रिषभ पंत, मॅथ्यू वेड
फलंदाज – पृथ्वी शॉ, टीम सिफर्ट, शुबमन गिल, डेव्हिड मिलर
अष्टपैलू – हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया
गोलंदाज – कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली
अभिमानास्पद! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची जीएस लक्ष्मीवर मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर
‘दुसऱ्या डावात स्विमिंग पूल पाहायला मिळतो’, असं का म्हणाला श्रेयस अय्यर?