---Advertisement---

रॉयचा वेस्ट इंडिजमध्ये ‘राडा’! २४५ च्या स्ट्राईक रेटने ठोकले वादळी शतक; मेगा लिलावात…

jason-roy
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा जशी जशी जवळ येत आहे, तशी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. पुढच्या महिन्यात आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावाकडे (IPL mega auction 2022) सर्वांचेच लक्ष लागुन आहे. अशातच इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय (jason roy) त्याने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे चर्चेत आला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी वार्म अप सामन्यात रॉयने ३६ चेंडूत शतक ठोकले आहे. या खेळीनंतर रॉयला मेगा लिलावात नक्कीच महत्व प्राप्त होईल.

टी२० मालिकेपूर्वी इंग्लंडने हा सराव सामना बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन प्रेसीडेंट ११ या संघासोबत खेळला. या सामन्यात रॉयने एकूण ४७ चेंडू खेळले आणि यामध्ये ११५ धावा केल्या. या शतकीय खेळीत त्याचा स्ट्राइक रेट २४४.६८ होता आणि त्याने मैदानावर ९ चौकार आणि १० षटकार मारले. पहिल्या विकेटसाठी जेसनने टॉम बॅंटन (३२) याच्यासोबत १४१ धावंची भागीदारी केली. रॉयच्या दमदार खेळीच्या जोराबर इंग्लंडने या सामन्यात २० षटकात २३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बार्बाडोस ११ संघाने १३७ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. इंग्लंडने सामना ९४ धावांनी जिंकला.

जेसन रॉयच्या या शतकी खेळीनंतर यात कसलीच शंका नाही की, मेगा लिलावात सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असेल. मागच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादने रॉयला त्याची बेस प्राइस २ करोड रूपयांमध्ये विकत घेतले होते. त्याने मागच्या आयपीएल हंगामात ५ डावांमध्ये ३० च्या सरासरीने १५० धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत १३ आयपीएल सामने खेळले आहेत आणि १२९.०२ च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. १३ डावांमध्ये तो फक्त २ अर्धशतके करू शकला आहे. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त रॉय आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात लायन्ससाठी देखील खेळला आहे.

दरम्यान, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमधील पाच सामन्यांच्या ही टी२० मालिका २२ जानेवारीला सुरु होणार आहे. मालिका २२ ते ३० जानेवारीदरम्यान खेळली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी, इंग्लंडने ऍशेस मालिकेत खूपच निराशाजन प्रदर्शन केले होते. ऑस्ट्रेलियाने ऍशेसमध्ये ४-० ने इंग्लंडचा पराभव केला होता. अशात आगामी मालिकेत चांगले प्रदर्शन करण्याचा इंग्लंडवर दबाव असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज ‘स्पीडस्टार’ला व्हायचेय ‘या’ देशाचा गोलंदाजी प्रशिक्षक; स्वत: व्यक्त केली इच्छा

कोरोनाची आडकाठी कायम! मायदेशातील ‘त्या’ मालिकेबाबत बीसीसीआय घेणार महत्त्वपूर्ण निर्णय

पहिल्या सामन्यातील पराभवासाठी राहुलने ‘या’ खेळाडूंना ठरविले दोषी; म्हणाला…

व्हिडिओ पाहा –

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---