इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोपा झाला. ब्रुकने वनडे क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. ब्रूकने सन 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पहिले आणि शेवटचे आयपीएल खेळले. जरी ब्रूक आतापर्यंत आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळला नाही. तरीही फ्रँचायझी मालकांमध्ये त्याच्या कौशल्याची बरीच चर्चा आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याला चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे.
हे तीन संघ हॅरी ब्रूकवर मोठे पैज लावू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांची फलंदाजी मजबूत करण्याची नितांत गरज आहे, विशेषतः जर त्यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिसला सोडले तर. या संघासाठी हॅरी ब्रूक हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची आक्रमक फलंदाजी शैली आणि युवा ऊर्जा रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजी युनीटला आणखी मजबूत बनवेल. ज्यामुळे संघाच्या संधी आणखी वाढतील.
गुजरात टायटन्स (GT)
गुजरात टायटन्सलाही आपला संघ आणखी मजबूत करायचा आहे. हॅरी ब्रूकला वरच्या क्रमवारीत फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास तो संघासाठी उत्कृष्ट सलामीवीर ठरू शकतो. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, गुजरात टायटन्स त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यास उत्सुक आहे. ज्यामुळे त्यांची फलंदाजी आणखी मजबूत होईल.
पंजाब किंग्स (PBKS)
आयपीएल 2025 साठी पंजाब किंग्स आपल्या संपूर्ण संघात बदल करण्याचा विचार करत आहे. शिखर धवनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर संघ नव्या कर्णधार आणि स्फोटक फलंदाजाच्या शोधात आहे. रिकी पाँटिंग प्रशिक्षक बनल्यानंतर पंजाब किंग्स युवा प्रतिभेवर लक्ष केंद्रित करत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी हॅरी ब्रूकला विकत घेतल्यास ब्रूक पॉन्टिंगच्या कोचिंगमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकेल.
हेही वाचा-
बीसीसीआयचा अचानक मोठा निर्णय, हे 3 खेळाडू दुसरी कसोटी खेळणार नाहीत
ICC Test Rankings; यशस्वी जयस्वालचा टॉप-5 मध्ये प्रवेश, विराट-रोहितचे भारी नुकसान
कानपूर कसोटीत पुन्हा दिसेल अश्विनचा दरारा, वॉर्न-झहीर सारख्या दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात!