---Advertisement---

मेगा लिलावत आरसीबीची योग्य खेळी! या खेळाडूला ताफ्यात घेताचं 15 चेंडूत ठोकले अर्धशतक

Liam-Livingstone
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग यंदाचा (2025) चा मेगा लिलाव झाला. या दोन दिवसीय मेगा लिलावात 10 फ्रेंचायझी संघांनी जगभरातील क्रिकेटपटूंना खुलेआम खरेदी केले. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने थोडासा कंजूषपणा दाखवला असेल, पण दुसऱ्या दिवशी संघाने भरपूर खरेदी केली. या खरेदीत आरसीबीने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टनलाही विकत घेतले.

लियम लिव्हिंगस्टनला आरसीबीने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले. विकत घेताच लिव्हिंगस्टनने हे देखील सिद्ध केले की त्याच्यावर लावलेली बोली आरसीबीसाठी किती योग्य आहे. लिव्हिंगस्टन अबू धाबी टी10 लीगमधील बांगला टायगर्सचा भाग आहे. 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात बांगला टायगर्स संघ अडचणीत सापडला तेव्हा त्याने धमाकेदार खेळी खेळली. जी पाहून आरसीबी संघ व्यवस्थापन तसेच आरसीबी क्रिकेट चाहत्यांना आनंद होईल.

दिल्ली बुल्सने 10 षटकांत 6 बाद 123 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगला टायगर्सने 6.4 षटकात 2 गडी गमावून केवळ 65 धावा केल्या, यानंतर लिव्हिंग्स्टनने असा कहर केला की सगळे बघतच राहिले. लिव्हिंग्स्टनने 15 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी करत बांगला टायगर्सला विजय मिळवून दिला. दिल्ली बुल्सकडून 9वे षटक नवीन उल हकने टाकले. ज्यात त्याने 29 धावा खेचल्या. हे षटकच सामन्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरले. लिव्हिंगस्टन 15 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद परतला.

बांगला टायगर्सने 9.4 षटकात तीन विकेट गमावत 124 धावा करत सामना जिंकला. बेंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांचे नंदनवन मानले जाते आणि लिव्हिंगस्टनच्या फलंदाजासाठी येथे खेळणे खूप मजेदार असणार आहे. लिव्हिंगस्टन याआधी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघाचा भाग आहे. टी20 इंटरनॅशनल बद्दल बोलायचे तर, लिव्हिंग्स्टनने 55 सामन्यात 151.11 च्या स्ट्राईक रेटने एकूण 881 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 32 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

हेही वाचा-

लिलावानंतर मुंबई इंडियन्सची पलटण मजबूत! संघानं धोनीच्या विश्वासूलाच घेतलं ताफ्यात
IPL 2025 : मुंबई, चेन्नईमध्ये कोणते नवीन खेळाडू आले? सर्व संघांची संपूर्ण यादी येथे जाणून घ्या
IPL; यंदाच्या मेगा लिलावात सर्वात बलाढ्य संघ कोणी बनवला? पाहा तज्ञांचे मत!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---