---Advertisement---

MI vs LSG: रिषभ पंतने जिंकला टाॅस, मुंबई इंडियन्सला फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 45वा सामना आज (27 एप्रिल) खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडेवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनऊने आतापर्यंत मुंबईपेक्षा चांगला परफॉर्म केला आहे, कारण त्यांनी 7 सामन्यांमध्ये 6 वेळा विजय मिळवला आहे, आणि मुंबईने फक्त एकच विजय मिळवला आहे. तरीही, मुंबई इंडियन्स आता चांगल्या स्थितीत दिसते, कारण त्यांनी मागील काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर आजच्या सामन्यात निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणे निर्णायक ठरेल.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

लखनऊ – एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (यष्टीरक्षक-कर्णधार), अब्दुल समद, आयुष बदोनी, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयंक यादव

मुंबई- रायन रिस्केल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---