आयपीएल 2024 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असणारा मुंबई इंडियन्सचा संघ आज (दि. 7 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झुंज देणार आहे. पहिल्या विजयाच्या आशेवर असलेला मुंबईचा संघ आणि पुन्हा विजयाच्या मार्गालर परतण्यासाठी आसुसलेला दिल्लीचा संघ यांच्यात ही लढत होणार असल्याने आयपीएलचा आजचा सामना नक्कीच कांटे के टक्कर वाला होईल, यात शंका नाही. परंतू आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स वेगळ्या रणनितीने उतरण्याची शक्यता आहे. त्यातही सुर्यकुमार यादव संघात आल्याने काही महत्वाचे बदलही पाहायला मिळू शकतात. ( IPL Mumbai Indians vs Delhi Capitals MI Probable Playing XI These 4 changes may occur )
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यात मुंबईच्या संघात प्रमुख चार बदल होतील, असे निश्चित मानले जात आहे. या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा आणि लेग स्पिनर श्रेयस गोपाल यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच सुर्यकुमार यादव आल्याने त्याचाही समावेश होणार, हेही निश्चित आहे. याचा अर्थ हे प्रमुख चार बदल आजच्या सामन्यात सर्वांना पाहायला मिळू शकतात.
सुर्यासह मुंबईच्या या तिन्ही खेळाडूंनी प्रतिभा चांगली आहे. परंतू अद्याप त्यांना संधी मिळालेली नाही, मोहम्मद नबी हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तुषारा याला लसिथ मलिंगाचा क्लोन म्हटले जाते. त्याने नुकताच आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात हॅट्ट्रीक घेण्याचा पराक्रम केलाय. त्याची गोलंदाजी एक्शन देखील मलिंगासारखीच आहे. तर श्रेयस गोपाल हाही चांगला प्रतिभावान खेळाडू आहे.
The 𝐒𝐤𝐲’s out in Wankhede 😉💙 #MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @surya_14kumar pic.twitter.com/h8pxDkHhzg
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2024
अधिक वाचा –
– राजस्थाननं आरसीबीविरुद्धच्या सामन्यात वेगळी जर्सी का घातली? जाणून घ्या कारण
– IPL 2024 मधील पहिलं शतक, ‘किंग कोहली’नं जयपूरमध्ये पाडला धावांचा पाऊस!
– ‘रन मशीन’ कोहली थांबायचं नाव घेईना! आयपीएलमध्ये रचला आणखी एक इतिहास; आसपासही कोणी नाही!