---Advertisement---

आयपीएलमध्ये विकले गेले 5 सर्वात महागडे भारतीय खेळाडू, युवराज सिंगचा रेकॉर्ड आजपर्यंत अतूट

On: रविवार, ऑक्टोबर 6, 2024 1:37 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 पूर्वी या वर्षाच्या अखेरीस मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार दर तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जातो. या लिलावात यापूर्वीचे अनेक विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात की, आतापर्यंत कोणते भारतीय खेळाडू आहेत, जे आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमतीला विकले गेले.

युवराज सिंग
या यादीत पहिले नाव एका भारतीय फलंदाजाचे आले आहे. ज्याने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली. होय, आपण बोलतोय युवराज सिंगबद्दल. भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमध्ये युवराजच्या नावावर इतके रेकॉर्ड नाहीत. पण तरीही 2015 च्या लिलावात दिल्ली संघाने युवराजला 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते. जी भारतीय खेळाडूवर लावलेली आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आहे. युवराज सिंगने आयपीएलमध्ये 132 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 126 डावात 2750 धावा केल्या आणि 36 विकेट्सही घेतल्या.

ईशान किशन
भारतीय आणि झारखंडचा युवा खेळाडू ईशान किशनने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संघासाठी शानदार खेळी केली आहे. या युवा फलंदाजाने मुंबई संघासाठी अनेक हंगाम खेळले आहेत. 2022 मध्ये मुंबईने 15.25 कोटी रुपयांमध्ये ईशानला त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. इशानने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 105 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 99 डावांमध्ये 2644 धावा केल्या आहेत.

हर्षल पटेल
या यादीत अशा भारतीय गोलंदाजाचे नाव येते ज्याने भारतासाठी फार कमी क्रिकेट खेळले आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये अनेकदा आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना गोत्यात आणले आहे. त्याच्याकडे गोलंदाजीची भिन्नता आहे. ज्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणे अधिक कठीण होते. हर्षल 2024 साली पंजाब संघाकडून खेळला होता. पंजाबने त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने आतापर्यंत आयपीएलचे 106 सामने खेळले आहेत. ज्यामुळे त्याच्या नावावर 124 विकेट्स आहेत.

जयदेव उनादकट
आयपीएलमध्ये आतापर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळणाऱ्या भारताच्या डावखुऱ्या गोलंदाजाने जयदेव उनादकटला 11 कोटी 50 लाख रुपयांमध्ये समाविष्ट केले आहे. 32 वर्षीय जयदेव उनाडकट हा गुजरातचा आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. जयदेव 2010 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये प्रथमच त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने आयपीएलमध्ये एकूण 105 सामने खेळले असून त्याच्या नावावर 99 विकेट आहेत.

गौतम गंभीर
गौतम गंभीर हे भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ज्यांने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली होती. गौतम गंभीरचा 2011 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 11 कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत त्यांच्या संघात समावेश केला होता. त्या मोसमात लिलावात विकला गेलेला तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरमध्ये सामील झाल्यानंतर, गंभीरने त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दोनदा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. गंभीरने आयपीएलमध्ये 158 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 4217 धावा आहेत.

हेही वाचा-

आयपीएल 2025 पूर्वी हार्दिक पांड्याला धक्का! मुंबईच्या कर्णधारपदासाठी हा खेळाडूने केली ईच्छा व्यक्त
भारतात होणार पुढील आशिया कप, परंतु रोहित-विराट खेळणार नाहीत! कारण जाणून घ्या
संजूचे नशीब उजळले! सूर्याच्या नेतृत्तवात नव्या भुमिकेत दिसणार, सामन्यापूर्वी संघात मोठे बदल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---