आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाची सुरुवात आरसीबी विरुद्ध केकेआर (RCB vs KKR) सामन्याने होणार आहे. तत्पूर्वी क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी काही नव्या नियमांची अंमलबजावणी केली आहे. ज्यामध्ये विशेषत: सामन्यानंतरच्या सादरीकरण सोहळ्यासाठी ड्रेस कोडशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत.
या नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला किंवा सपोर्ट स्टाफ सदस्याला सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान स्लीव्हलेस जर्सी (बाहू नसलेली जर्सी) आणि फ्लॉपी हॅट (रुंद कडांची टोपी) परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयच्या मते, हा निर्णय खेळाच्या व्यावसायिकतेला व शिस्तीला अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेतला आहे.
???? SLEEVELESS JERSEYS BANNED. ????
– The BCCI has banned floppies and sleeveless jerseys during IPL post match presentation.
– Players breaching this will receive a warning in the 1st instance.
– There will be a financial penalty from the 2nd instance onwards. (Cricbuzz). pic.twitter.com/wGu2oOFqTL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 6, 2025
बीसीसीआयच्या मते, क्रिकेट हे एक व्यावसायिक खेळ आहे, सादरीकरणाच्या वेळी खेळाडूंनी सुशोभित आणि शिस्तबद्ध पोशाखात दिसावे, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पुरस्कार सोहळ्यात खेळाडूंनी योग्य व अधिकृत संघाच्या जर्सीचा वापर करावा, जेणेकरून स्पर्धेचे आणि प्रायोजकांचे ब्रँडिंग प्रभावीपणे सादर होईल. जर एखाद्या खेळाडूने स्लीव्हलेस जर्सी किंवा फ्लॉपी हॅट परिधान करून नियमांचे उल्लंघन केले, तर प्रथम त्याला अधिकृत इशारा दिला जाईल. जर त्याच खेळाडूने पुन्हा नियम तोडला, तर त्याच्यावर आर्थिक दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम किती असेल, याबाबत बीसीसीआय लवकरच अधिकृत घोषणा करेल.
या नवीन नियमांमुळे खेळाडूंच्या वेशभूषेला अधिक औपचारिक व शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त होईल, तसेच आयपीएलच्या ब्रँड मूल्याला चालना मिळेल.
हेही वाचा-
रोहित शर्माच्या फिटनेसवर सूर्यकुमार यादवचे मोठे वक्तव्य, अंतिम सामन्यासाठी संघाला पाठिंबा!
Mohammed Shami: रोजा न पाळल्याने मोहम्मद शमी अडचणीत, मौलानांनी ठरवले ‘गुन्हेगार’
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! माजी भारतीय कर्णधार पुन्हा मैदानात उतरणार, निवृत्तीचा निर्णय मागे






