आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव आणि इतर काही कारणांमुळे आगामी हंगामाबाबत सतत चर्चा होत आहे. रिंटेन्शमुळे रोज काही ना काही बातम्या येत आहेत. दरम्यान आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जी पुढील हंगामातील सामन्यांच्या संख्येशी संबंधित आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमात सामन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पुढच्या हंगामात देखील आपल्याला फक्त 74 सामने पाहायला मिळतील. जसे की आयपीएल 2024 मध्ये घडले होते.
जेव्हा 2023-27 साठी आयपीएलचे मीडिया हक्क विकले गेले. तेव्हा आयपीएलने प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या सामन्यांची संख्या सेट केली होती. 2023 आणि 2024 च्या हंगामात 74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये प्रत्येकी 84 सामने अशी जास्तीत जास्त सामन्यांची संख्या निर्धारित केली होती.
दरम्यान आता ईएसपीएन क्रिकइन्फोच्या बातमीनुसार, आयपीएल 2025 मध्ये मागील हंगामाप्रमाणेच सामने खेळले जातील आणि टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. ज्यामध्ये बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका देखील आहेत. त्याचबरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी दक्षिण आफ्रिकेत टी20 मालिकाही खेळवली जाणार आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मर्यादित क्रिकेटमध्ये इंग्लंडचे यजमानपदही द्यायचे आहे. अशा स्थितीत खेळाडूंवर कामाचा बोजा सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.
NO INCREASE IN IPL MATCHES.
– The BCCI has decided to continue with 74 matches for IPL 2025 instead of 84 due to players’ workload management. (Espncricinfo). pic.twitter.com/SRoVr85eFX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
नुकतेच, पुढील हंगामातील सामन्यांच्या संख्येबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, आम्ही आयपीएल 2025 मध्ये 84 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला नाही. कारण सामन्यांच्या वाढीमुळे आम्हाला खेळाडूंच्या लोडची काळजी घ्यावी लागेल. 84 सामने कराराचा भाग आहेत. 74 सामने आयोजित करायचे की 84 हे बीसीसीआय लवकरच ठरवेल.
आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. फ्रँचायझीसोबतच पुढच्या हंगामासाठी किती खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल आणि इतर नियम काय असतील याचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी त्यांच्याकडून लवकरच घोषणा होऊ शकते.
हेही वाचा-
रिषभ पंतसाठी एमएस धोनीला मागे टाकणे सोपे नाही, या बाबतीत माही टाॅपवरच..
धोनीच्या विश्वासू खेळाडूची निवृत्ती; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा
147 वर्षांच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही, श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यात हा मोठा पराक्रम