आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यास अजून बराच वेळ आहे. पण त्याआधीच चाहत्यांच्या नजरा मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएलच्या पुढील हंगामासाठी भव्य बोली होणार आहे. या मेगा लिलावासाठी देश-विदेशातील 1574 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे. ज्यामध्ये अनेक स्टार फिरकी गोलंदाजही उपस्थित आहेत.
मेगा लिलावादरम्यान, सर्व संघ त्यांच्या फिरकी गोलंदाजी युनिटला मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रवेश करतील. यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय असतील. पण काही फिरकीपटू आहेत ज्यांना संघ मेगा लिलावात किंमत देणार नाहीत. या लिलावादरम्यान काही मोठे दिग्गज फिरकी गोलंदाज आहेत. परंतु त्यांना खरेदीदार सापडण्याची शक्यता खुप कमी आहे. या बातमीद्वारे आपण अशा 3 फिरकीपटूंचा उल्लेख करणार आहोत.
3. ॲडम झाम्पा
ऑस्ट्रेलिया संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सध्याचा सर्वात प्रमुख फिरकी गोलंदाज ॲडम झम्पा देखील मेगा लिलावात दिसणार आहे. जरी झाम्पा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप चांगले स्थान मिळवत आहे. पण आयपीएल लिलावादरम्यान त्याला कोणत्याही संघाने उचलले जाण्याची शक्यता फारच कमी दिसते. अशा परिस्थितीत हा कांगारू फिरकी गोलंदाज न विकला जाऊ शकतो.
2. अमित मिश्रा
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट असलेला माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अमित मिश्रा हा मोठा बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. पण आता या फिरकी गोलंदाजासाठी आयपीएलमधील कोणत्याही संघात स्थान मिळवणे खूप कठीण आहे. या फिरकी गोलंदाजाचे नाव पुन्हा एकदा मेगा लिलावात दिसणार आहे. पण कोणताही संघ त्याला महत्त्व देईल आणि त्याला संघात सामील करून घेईल अशी शक्यता फारच कमी आहे.
1. पियुष चावला
भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजेत्या संघात खेळलेला माजी फिरकी गोलंदाज पियुष चावला हा देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पण आता हळूहळू वाढत्या वयामुळे त्याच्या कामगिरीत घट झाली आहे. मेगा लिलावाच्या यादीत चावलाचा नक्कीच समावेश आहे. पण क्वचितच कोणताही संघ त्याच्यावर बोली लावू शकेल.
हेही वाचा-
“देशासाठी शतक झळकावण्याचं माझं स्वप्न… “,सामना संपल्यानंतर तिलक वर्मा भावूक, या व्यक्तीला दिले श्रेय
IND VS SA; वरुण चक्रवर्तीने मोडला आर आश्विनचा मोठा रेकाॅर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच
अक्षर पटेल बनला ‘सुपरमॅन’, हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO