गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्सची पहिल्या दोन वर्षात कामगिरी शानदार होती. नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टाययन्स आयपीएल 2022 मध्ये चॅम्पियन बनले. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये उपविजेता संघ ठरला. पण आयपीएल 2024 मध्ये संघाला काही खास कामागिरी करता आले नाही.
यंदाच्या मोसमात आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली आणि शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आठव्या स्थानावर आहे. एकंदरीत आशिष नेहरा हे मुख्य प्रशिक्षक म्हणून यशस्वी झाले असले. तरी त्यांचा कार्यकाळ वाढणार नसल्याचे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. आशिष नेहराच्या जागी युवराज सिंगला मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. तथापि, आम्ही या बातमीद्वारे तुम्हाला ती 3 मोठी कारणे सांगणार आहोत ज्यांमुळे युवराज सिंगचा दावा खूप मजबूत मानला जातो.
युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांच्यात चांगले संबंध
युवराज सिंग आणि आशिष नेहरा यांचे नाते खूप घट्ट आहे. दोघेही खूप दिवसांपासून चांगले मित्र आहेत. तसेच युवराज सिंग आणि आशिष नेहरा भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळले. मात्र, आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यास युवराज सिंगला मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
अनुभव आणि नेतृत्व क्षमता
युवराज सिंगने 2019 मध्ये व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केला आहे. पण त्याआधी त्याने आयपीएलचे 132 सामने खेळले. आयपीएल सुरू झाले तेव्हा युवराज सिंग पंजाब किंग्जचा (तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब) कर्णधार होता. युवराज सिंगची नेतृत्व गुणवत्ता चांगली असल्याचे मानले जाते. शिवाय तो मार्गदर्शकाची भूमिकाही चांगल्या प्रकारे निभावू शकतो.
पंजाब कनेक्शन
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि युवराज सिंग हे दोघेही पंजाबचे आहेत. याशिवाय युवराज सिंग शुबमन गिलला मार्गदर्शन करत आहे. दोघांमधील संबंध अतिशय सुटसुटीत आहे. मात्र, युवराज सिंग प्रशिक्षक बनल्यास तो पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा-
‘बाबर आझम’ नाही तर हे 3 स्टार फीट क्रिकेटर्स, माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य
रिषभ पंतला बांग्लादेश मालिकेत संधी मिळणार? शमीच्या खेळावरही सस्पेंस!
बांग्लादेश मालिकेपूर्वी संघाला धक्का, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी