---Advertisement---

शार्दुल ठाकूर पर्पल कॅपचा नवा मानकरी, ऑरेंज कॅप कोणाकडे?

---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत सात सामने खेळले गेले आहेत. सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यानंतर, ऑरेंज आणि पर्पल कॅप होल्डर यादीत बदल झाला आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला नूर अहमद आता मागे पडला आहे. तर दुसरीकडे, ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही असेच काहीसे दिसून आले आहे. आतापर्यंत अव्वल स्थानावर असलेला ईशान किशन आता चौथ्या स्थानावर घसरला आहे. खरंतर, लखनऊविरुद्धच्या सामन्यात ईशान शून्यावर बाद झाला होता. याचे परिणाम त्याला भोगावे लागले.

आयपीएल 2025च्या ऑरेंज कॅपधारकांबद्दल बोलायचे झाले तर, या यादीत आता पहिल्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन आहे. पूरनने हैदराबाद विरुद्ध विक्रमी खेळी खेळली. त्याने पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावले होते. अशाप्रकारे, पूरन दोन सामन्यांमध्ये 145 धावांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पूरनचा सहकारी मिशेल मार्श आहे, ज्याने आतापर्यंत 124 धावा केल्या आहेत. एसआरएचचा ट्रॅव्हिस हेड 114 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर ईशान किशन 106 धावांसह तर चौथ्या आणि राजस्थानचा ध्रुव जुरेल 103 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएल 2025 ऑरेंज कॅप यादी

निकोलस पूरन एलएसजी 145
मिचेल मार्श एलएसजी 124
ट्रॅव्हिस हेड एसआरएच 114
इशान किशन एसआरएच 106
ध्रुव जुरेल आरआर 103

जर आपण आयपीएल 2025 च्या गोलंदाजांच्या पर्पल कॅप शर्यतीबद्दल बोलायचे झाले, तर येथेही काही बदल दिसून आले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सच्या लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या शानदार कामगिरीमुळे सीएसकेचा नूर अहमद या शर्यतीत मागे पडला आहे. आता या यादीत शार्दुल ठाकूर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आहेत. तर, नूर अहमद एका सामन्यात चार विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेचा खलील अहमद तीन विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबीचा कृणाल पांड्या आणि गुजरात टायटन्सचा आर साई किशोर प्रत्येकी तीन विकेट्ससह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

आयपीएल 2025 पर्पल कॅप यादी

शार्दुल ठाकूर एलएसजी 6 विकेट्स
नूर अहमद सीएसके 4 विकेट्स
खलील अहमद सीएसके 3 विकेट्स
कृणाल पांड्या आरसीबी 3 विकेट्स
आर साई किशोर गुजरात 3 विकेट्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---