---Advertisement---

ठरलं! या शहरात होणार आयपीएल २०२०चा लिलाव

On: बुधवार, नोव्हेंबर 6, 2019 11:24 AM
---Advertisement---

आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंंबरला कोलकाता (Kolkata) शहरात होणार आहे. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आयपीएलच्या पुढच्या हंगामाला एप्रिल आणि मे महिन्यापासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी या हंगामातील खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदा कोलकाता शहरात  होणार आहे. कोलकाता हे शहर शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स संघाचे घरचे मैदान आहे.

आयपीएलच्या इतिहासात खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्याची कोलकाताची पहिलीच वेळ असेल.

येत्या आयपीएल हंगामासाठी सर्व संघांकडे त्यांच्या संघ उभारणीसाठी 85 कोटी रुपये असणार आहेत. मागील मोसमापेक्षा 13 व्या हंगामासाठी सर्व संघाकडे 3 कोटी रुपये ज्यादाचे असणार आहेत.

आता प्रत्येक फ्रेंचायझीकडे मागील हंगामातील शिल्लक रक्कम आणि या हंगामातील 3 कोटी रुपये असणार आहेत. त्यामुळे फ्रेंचायझीला चांगले खेळाडू घेण्यास मदत होणार आहेत.

मागील वर्षाच्या लिलावानंतंर 2020 आयपीएलच्या लिलावासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सर्वाधिक 8.2 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर, राजस्थान राॅयल्सकडे 7.15 कोटी आणि कोलकाता नाईट रायडर्सकडे 6.05 कोटी रुपये शिल्लक आहेत.

या वर्षी होणारा लिलाव हा छोटा असणार आहे. यानंतर आयपीएल 2021 मध्ये होणारा लिलाव हा नव्याने होईल.

आयपीएल 2020मध्ये होणाऱ्या लिलावापूर्वी फ्रेंचायझीकडे असणारी शिल्लक रक्कम-

3.2 कोटी रुपये – चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

7.7 कोटी रुपये – दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

3.7 कोटी रुपये – किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)

6.05 कोटी रुपये – कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

3.55 कोटी रुपये – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

7.15 कोटी रुपये – राजस्थान राॅयल्स (Rajasthan Royals)

1.80 कोटी रुपये – राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)

5.30 कोटी रुपये – सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---