---Advertisement---

RR vs KKR: ‘हा’ ठरला कोलकत्याच्या विजयाचा टर्निंग पॉईंट

On: गुरूवार, मार्च 27, 2025 7:44 AM
---Advertisement---

IPL 2025: गतविजेत्या केकेआरने यंदाच्या हंगामातील पहिल्य विजायची नोंद केली. संघाच्या अष्टपैलू कामगिरीने केकेआरने राजस्थान राॅयल्सवर 8 विकेट्सने दमदार विजय मिळवला. आयपीएल 2025 मधील सहावा सामना काल (26 मार्च) गुवाहटी येथे राजस्थान विरुद्ध कोलकाता यांच्यात खेळला गेला.

टाॅस गमावल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीस आलेल्या राजस्थान राॅयल्सने मर्यादित 20 षटकात 151 धावा केल्या, राजस्थाानची सुरुवात पाहता संघ 200 धावा काढण्यात आग्रेसर होता, पण केकेआरच्या फिरकी गोलंदाजांनी सुसाट चाललेल्या रियान परागच्या संघाला ब्रेक लावला. 6 षटकात 54-1 अश्या स्थितीत असलेला संघ 20 षटकानंतर 9 विकेट गमावून केवळ 151 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

मधल्या फळीत केकेआरच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार कमगिरीच्या जोरावर कोलकत्याने सामन्यावर पकड मजबूत केली. वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तर मोईन अलीने 4 ओव्हरर्समध्ये 26 धावा देत निर्णायक 2 विकेट्स घेतल्या. केकेआरच्या फिरकी गोलंदाजी समोर राजस्थानचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. आरआरकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 33 धावा केल्या. आखेरीस राजस्थानने 20 षटकात 151 धावा जोडल्या, जे केकेआरने क्विंटन डी काॅकच्या 97 धावांच्या जोरावर 17.3 षटकांत पूर्ण केल्या. आशाप्रकाने कोलकाता नाईट रायडर्सने हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---