आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं नुकतेच 2025 मेगा लिलावासाठी रिटेन्शन नियम जाहीर केले. एक संघ अनकॅप्ड खेळाडूंसह जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन करू शकतो. तर पाच वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला भारतीय खेळाडू अनकॅप्ड मानला जाईल.
चेन्नई सुपर किंग्जला महेंद्रसिंह धोनीला रिटेन करता यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अनेकांचं मत आहे. धोनीनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 मध्ये खेळला होता. आता भारताचा माजी क्रिकेटमटू मोहम्मद कैफ यानं अनकॅप्ड खेळाडू नियम आणि धोनीच्या संभाव्य रिटेन्शनबद्दल टिप्पणी केली आहे. मोहम्मद कैफ म्हणाला की जोपर्यंत धोनीला खेळण्याची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलमध्ये नियम बदलत राहतील.
धोनीनं 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तो फक्त आयपीएलमध्ये सक्रिय आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेनं पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानं गेल्या वर्षी सीएसकेचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं होतं. अनकॅप्ड नियम लागू केल्यानंतर कैफनं 43 वर्षीय धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. फ्रँचायझी अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन करू शकतील. अशा परिस्थितीत सीएसकेच्या पर्समधून बरेच पैसे वाचले जातील.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना कैफ म्हणाला, “तुम्हाला एमएस धोनीला पुन्हा पाहण्याची संधी मिळेल. तो तंदुरुस्त आहे आणि 200 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय. तो विकेटमागे चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे जोपर्यंत त्याला खेळायचं आहे, तोपर्यंत नियम बदलत राहतील. धोनीला आयपीएलमध्ये खेळायचं असेल तर तो खेळेल. तो खूप मोठा खेळाडू आहे. तो एक मोठा मॅच विनर आहे. तो सीएसकेचा नेता आहे.”
कैफ पुढे म्हणाला, “माझ्या मते नियमात झालेला बदल योग्य आहे. मला वाटतं, जर तो तंदुरुस्त असेल आणि चांगला खेळत असेल तर नियम का बदलू नयेत. त्याला खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. धोनीसारख्या खेळाडूसाठी नियम का बदलू नयेत?, असं कैफ म्हणाला.
हेही वाचा –
पृथ्वी शॉनं धो-धो धुतलं! कसोटीत टी20 स्टाईल फलंदाजी; फक्त एवढ्या चेंडूत ठोकलं अर्धशतक
शतकाच्या अगदी जवळ येऊनही दूर राहिला भारतीय खेळाडू, एका चुकीमुळे झालं मोठं नुकसान
मुलीला भेटल्यानंतर हसीन जहाँचे शमीवर गंभीर आरोप; म्हणाली, “तो फक्त दाखवण्यासाठी…”