---Advertisement---

साई सुदर्शनची परिपक्व खेळी, गुजरातचा एकतर्फी विजय

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील नववा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. जो की हा सामना गुजरातने 36 धावांनी जिंकला, हा विजयासह गुजरातने आपले विजयाचे खातेही उघडले आहे. दुसरीकडे हा मुंबईचा सलग दुसरा पराभव होता. या सामन्यात साई सुदर्शनने 63 धावांची जबाबदारी खेळी खेळली. ज्यामुळे संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.

टाॅस गमावल्यानंतर पहिल्या डावात खेळताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली, या दोघांच्या खेळीच्या खेळीमुळे संघाने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. पण गिल 36 धावांवर बाद झाला. पण साई सुदर्शनने 63 धावा करत संघाला चंगल्या स्थितीत नेऊन ठेवले. त्याने आपल्या खेळीत 4 चाैकार व 2 षटकार मारले. पण तो 18 व्या षटकात संघाच्या 179 धावासंख्येवर बाद झाला. यानंतर शेरफेन रदरफोर्डच्या 18 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने मर्यादित 20 षटकात 196 धावा बनवल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फार खराब सुरुवात झाली. पहिल्या षटकात रोहित शर्मा 8 धावांवब बाद झाला त्या मोहम्मद सिराजने त्रिफळाचित केले, यानंतर रायन रिक्लटनलाही सिराजने परत पाठवले. तो 6 धावा करुन बाद झाला. यानंतर तिलक वर्मा (39) व सूर्यकुमार यादव (48) यांनी भागीदारी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले. हार्दिक पांड्या 11 धावा काढून बाद झाला. गुजरातकडून गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---