हैद्राबाद। काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला होता. 118 या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई 87 धावांतच गारद झाली होती.
यावेळी हैदराबादचा गोलंदाज सिद्धार्थ कौलने या सामन्यात चांगली कामगिरी केली. या सामन्यात त्याने 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. तरीही बीसीसीआयने त्याला फटकारले आहे.
या सामन्यात सिद्धार्थने काही नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात आले. त्याने मुंबईचा मयांक मारकंडे ह्याला एलबीडब्ल्यू बाद केल्यानंतर त्याच्यासमोर आंनद व्यक्त केला होता.
आइपीएलच्या आचार संहितानुसार कलम 2।1।4 च्या अंतर्गत लेव्हल 1 नुसार खेळांडूनी आणि संघ अधिकाऱ्यांनी त्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. तसेच नियम असा आहे की, मैच रेफरीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो.
हैदराबाद संघाने या आयपीएलमधील सगळ्यात छोट्या लक्षाचा बचाव करताना मुंबईला 31 धावांनी पराभूत केले होते. पहिली फलंदाजी करताना हैदराबादने 18.4 षटकात 118 धावा केल्या होत्या.