SRH Block David Warner: इंडियन प्रीमिअर लीग हे जगभरातील नवख्या आणि दिग्गज क्रिकेटपटूंना आपला दम दाखवून देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या लीगमध्ये आतापर्यंत हजारो खेळाडू खेळले आहेत, ज्यातील काही खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यात डेविड वॉर्नर याच्या नावाचाही समावेश आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये 6 हजारांहून अधिक धावांचा टप्पा पार केला आहे. वॉर्नर त्याच्या विस्फोटक फलंदाजी ओळखला जातो. अशात तो एका धक्कादायक कारणामुळे चर्चेत आला आहे.
माजी संघाने डेविड वॉर्नरला केले ब्लॉक
आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज आणि आपला माजी कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) याला इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून ब्लॉक (Sunrisers Hyderabad Block cricketer David Warner From Instagram And Twitter) केले आहे. याचा खुलासा स्वत: वॉर्नर याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी टाकून केला आहे.
वॉर्नरची स्टोरी
डेविड वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी टाकत मोठा खुलासा केला. त्याने स्टोरीमध्ये सनरायझर्स हैदराबादने इंस्टाग्राम आणि ट्विटरवरून ब्लॉक केल्याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. आता त्याचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
SRH have blocked David Warner from Twitter/X and Instagram. pic.twitter.com/ZH3NSQ3yzV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 19, 2023
वॉर्नरच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आयपीएल किताब
विशेष म्हणजे, हैदराबाद संघाने डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2016 हंगामाचा किताब जिंकला होता. मात्र, वॉर्नर आणि हैदराबादचे नाते 2021 हंगामात संपुष्टात आले. वॉर्नरने हैदराबादकडून 2014 ते 2021 यादरम्यान 95 सामने खेळताना 49.55च्या सरासरीने 4014 धावा केल्या होत्या. यामध्ये 2 शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश होता. 126 ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या राहिली होती.
वॉर्नर दिल्लीचा भाग
सध्या डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. मागील हंगामात त्याने रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचे नेतृत्व केले होते. तो आयपीएल 2024 हंगामात दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. वॉर्नरची एकूण आयपीएल कारकीर्द पाहिली, तर त्याने 176 सामन्यात 41.54च्या सरासरीने 6397 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 61 अर्धशतकांचा समावेश आहे. (IPL Sunrisers Hyderabad Block cricketer David Warner From Instagram And Twitter)
हेही वाचा-
आयपीएल 2015 नंतर खेळणारे ठरले नशीबवान! पाहा प्रत्येक हंगामातील महागडा खेळाडू
INDvsSA 2nd ODI: टॉस जिंकत यजमानांनी घेतली बॉलिंग, भारताकडून रिंकूचं वनडे पदार्पण; श्रेयस बाहेर