---Advertisement---

पहलगाम हल्ल्यानंतर IPL 2025 मध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी ‘वज्र सुपर शॉट’ तैनात

On: रविवार, एप्रिल 27, 2025 1:28 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेत आज डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेतील 45 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना दुपारी 3.30 वाजता खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत देश सुरक्षा वाढवत आहे. त्यामध्येच आता आयपीएलच्या सामन्यांमध्ये सुद्धा सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे. आयपीएलचे सामने ज्या स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहेत, तिथे सुरक्षेसाठी एन्टी ड्रोन सिस्टीम बसवण्यात आली आहे, या यंत्राचे नाव वज्र सुपर शॉट आहे. जे आकाशातून सर्व गोष्टींवर नजर ठेवण्याचे काम करते.

शनिवारी झालेल्या ईडन गार्डन सामन्यात सुद्धा वज्र सुपर शॉर्ट तैनात करण्यात आलेला होता. आयपीएल जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, यामध्ये जगातील प्रत्येक मोठा खेळाडू खेळत आहे. त्यामुळे बीसीसीआय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करत नाही. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक प्रकारची सुरक्षा बाळगली जात आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, आता प्रत्येक सामन्यात हे यंत्र काम करणार आहे.

एएनआयच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, शनिवारी देशभरातील इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या प्रत्येक सामन्यादरम्यान हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी स्वदेशी ड्रोन सिस्टीम म्हणजेच वज्र सुपर शॉट तैनात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वज्र सुपर शॉर्ट एक हलकं हातात पकडल जाणारं यंत्र आहे, जे की चार किलोमीटर दूर पर्यंत ड्रोनचा तपास आणि नजर ठेवण्याचे काम करण्यासाठी सक्षम आहे. ज्यामध्ये दूरवरून येणारं एखाद्या संकट सुद्धा प्रभावीपणे दिसू शकतं.

आयपीएल 2025 स्पर्धेतील 45 वा सामना आज मुंबई विरुद्ध लखनऊ तसेच 46 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात खेळला जाणार आहे. या हंगामात 74 सामन्यांसाठी 13 ठिकाणे निवडण्यात आली होती, ज्यामध्ये काही स्टेडियमवर होणारे सर्वसामने संपले आहेत. आता पंजाब किंग्स त्यांचे राहिलेले सामने धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. आज‌ होणाऱ्या सामन्यानंतर दिल्लीमध्ये दोन अजून सामने खेळले जातील. अंतिम सामन्यासहित प्लेऑफचे सर्वसामने कोलकाता आणि हैदराबादमध्ये खेळले जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---