---Advertisement---

त्याने झेपही घेतली अन् तो पडलाही, पण कॅच मात्र सोडला नाही, पाहा बटलरचा अविश्वसनीय झेल

On: शनिवार, ऑक्टोबर 22, 2022 10:46 PM
Jos-Buttler
---Advertisement---

शनिवारपासून (दि. 22 ऑक्टोबर) टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीला सुरुवात झाली. यात दोन सामने पार पडले. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला, तर दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. यातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने घेतलेला अविश्वसनीय झेल सर्वांचे लक्ष वेधत आहे. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

क्रिकेटमध्ये नेहमीच असे काही झेल पाहायला मिळतात, जे पाहून चाहतेही हैराण झाल्याशिवाय राहत नाहीत. काही खेळाडू क्षेत्ररक्षणादरम्यान अविश्वसनीय कारनामा करतात, ज्याची सर्वत्र चर्चा रंगते. असेच काहीसे जोस बटलर (Jos Buttler) याने करून दाखवले आहे. बटलरने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

झाले असे की, या सामन्यात अफगाणिस्तान संघ पहिल्यांदा फलंदाजी करत होता. यादरम्यान 15व्या षटकामध्ये इंग्लंडकडून मार्क वूड गोलंदाजी करण्यासाठी आला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी (Mohammad Nabi) याला एक शॉर्ट चेंडू टाकला. नबीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागील बाजूला गेला. चेंडू यष्टीरक्षण करत असलेल्या बटलरपासून खूप दूर होता, परंतु त्याने चित्त्याची चपळाई दाखवत डाव्या बाजूला उडी मारली आणि चेंडू झेलला.

बटलरचा हा शानदार झेल पाहून नबीला 3 धावांवरच पव्हेलियनमध्ये परतावे लागले. यादरम्यान इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी बटलरच्या झेलाची प्रशंसाही केली. हा व्हिडिओ शेअर करत राजस्थान रॉयल्स संघाने लिहिले की, “या प्रयत्नासाठी एक इमोजी सांगा.”

https://www.instagram.com/reel/CkBDYTgvRZc/?utm_source=ig_embed&ig_rid=d7426108-a933-46cb-a3e4-d64a993b0433

बटलरच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक बटलरला ‘जोस द बॉस’ म्हणत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये इमोजी बनवत आहेत आणि बटलरला सुपरहिरोही म्हणत आहेत.

या सामन्यात बटलरने फलंदाजी करताना 18 चेंडूत 18 धावा चोपल्या. तसेच, सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर अफगाणिस्तान संघाने दिलेल्या 112 धावांचे आव्हान इंग्लंडने 113 धावा करत पूर्ण केले. इंग्लंडसाठी ही विश्वचषकातील विजयी सुरुवात ठरली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध डेवॉन कॉनवेचा विश्वविक्रम, कुटल्या नाबाद 92 धावा
IND vs PAK | पावसाच्या प्रश्नावर बाबर आझमचे भन्नाट उत्तर, ‘नाही सर, आम्ही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---