---Advertisement---

IPL थरार: KKR आणि SRH यांच्यात कोण जिंकणार? आकडे सांगतात सत्य

On: गुरूवार, एप्रिल 3, 2025 6:22 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या आधी जाणून घ्या की कोणत्या संघाचं पारड जड आहे. आकड्यानुसार कोण वरचढ आहे चला तर पाहूया.

आयपीएल 2025 मध्ये आज पहिल्यांदा केकेआर आणि हैदराबाद संघांमध्ये टक्कर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांची थोडी खराब अवस्था आहे. केकेआर आणि हैदराबाद संघाने आतापर्यंत स्पर्धेत म्हणावं असं प्रदर्शन केलं नाही. केकेआर संघ पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे, तसेच सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाचे पारडं कायमच जड राहिलं आहे .दोन्ही टीमच्या हेट टू हेड रेकॉर्ड्स बद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. केकेआरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 19 सामने जिंकले आहेत, तसेच पॅट कमिन्सच्या हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध फक्त 9 सामने जिंकले आहेत. 2020 पासून केकेआरने हैदराबाद विरुद्ध 11 सामन्यांमध्ये 9 सामने जिंकले आहेत.

जरी आकडे केकेआर संघाच्या पक्षात असले तरीही या हंगामात सनरायजर्स हैदराबाद संघ वेगळ्या अंदाजात दिसत आला आहे. संघातील फलंदाजीचा विभाग एकदम मजबूत आहे. तसेच फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज यांचा विभाग देखील दमदार आहे. यामध्ये आज केकेआर आणि हैदराबाद संघामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.

कोलकाता आणि हैदराबाद सामन्याच्या प्रेडिक्शन बद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबाद संघाचं पारडं थोडं जड आहे. पण केकेआर संघाला ईडन गार्डन्स वर पराभूत करणं कोणत्याही संघासाठी सोपं नाही. तसेच धावांचा पाठलाग करणारा संघ आजचा सामना जिंकण्याची जास्त शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---