आयपीएलच्या १३ व्या हंगामाची साखळी फेरी आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे उशिरा सुरु झालेला हा हंगाम अनेक नियमांचे पालन करत सुरु आहे. त्यातील सर्वात मोठा नियम होता तो म्हणजे, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नाही. पण असे असतानाही टेलिव्हिजन किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सामने पाहणाऱ्या चाहत्यांना प्रेक्षकांची नसलेली उपस्थिती फार कमी प्रमाणात जाणवली. कारण टेलिव्हिजन आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे आवज ऐकू येत होते. पण हे कसे शक्य झाले या बद्दल थोडं जाणून घेऊयात.
मागील सामन्यांचा करावा लागला आभ्यास
हे शक्य झालं ते आयपीएलचे प्रसारणकर्ता असलेल्या स्टार इंडियाच्या एका टिममुळे. त्यांच्या एका टिमने अनेक रात्र जागून यासाठी काम केले आहे. स्टार इंडियाचे स्पोर्ट्स हेड संजोग गुप्ता यांनी याबाबत एएनआयशी बोलताना सांगितले की त्यांच्या टिममधील ऑडिओ प्रोड्यूसरने २ महिन्यांत १०० सामन्यांमधील प्रेक्षकांच्या आवाजाची एक लायब्ररी तयार केली, जी वेगवेगळ्या परिस्थितसाठी होती. त्यामुळे जेव्हा एमएस धोनी मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकार मारतो, तेव्हा वेगळा आवाज होतो. पण जेव्हा केएल राहुल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चौकार मारतो, तेव्हाचा आवाज वेगळा असतो. त्यामुळे त्यांनी एक आवाजांची लायब्ररी तयार केली आणि त्यानंतर त्यांनी ते सर्व आवाज पुन्हा रेकॉर्ड केले. कारण ते त्या सामन्यांचे मूळ आवाज घेऊ शकत नव्हते कारण त्यात अनेक गोष्टी मध्ये येत होत्या.
गुप्ता यांनी सांगितले की, त्यानंतर त्या आवाजाचा वापर करणे हे एक आव्हान होते. कारण त्यासाठी सातत्याने सामना पाहात रहाणे आणि कोणता क्षेत्ररक्षक कुठे आहे हे माहिती पाहिजे. तूम्ही त्यावेळी चूकीचा आवाज वापरु शकत नाही. म्हणूनच आम्ही त्यासाठी एक नवीन कार्यप्रवाह तयार केला आहे ज्यामुळे साऊंड इंजिनियर आणि ऑडिओ प्रोड्यूसर यांना क्षेत्ररक्षक कुठे आहे हे दिसू शकेल.
गुप्ता यांनी असेही सांगितले की जगातील अनेक प्रसारणकर्त्यांकडून त्यांना विचारण्यात आले की त्यांनी कोणता कार्यप्रवाह तयार केला आहे.
त्यामुळे प्रेक्षक स्टेडियममध्ये नसतानाही जो सर्वांना सामन्यादरम्यान आवाज येतो तो रेकॉर्डेड आवाज आहे.
समोर होती काही आव्हाने
याबरोबरच त्यांनी असेही सांगितले की या आयपीएलसाठी काही आव्हाने होती पण त्यांनी जून-जुलैपासून बीसीसीआयबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल होईल की नाही आणि झाली तरी कुठे होईल याबाबत सांशकता होती. शेवटच्या मिनिटापर्यंत याबाबत अनिश्चितता होती. पण आम्ही यासाठी तयार होतो.
या कठीण काळात त्यांना चाहत्यांना आनंद द्यायचा होता. त्याचबरोबर त्यांना यादरम्यान बायोबबलचे नियमही पाळायचे होते. तसेच आयपीएल एकदम प्लेन वाटायला नको म्हणून त्यासाठी व्हिडिओ आणि ऑडियोबाबत अनेक योजना आखण्यात आल्या होत्या, असेही गुप्ता यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020 Playoff: बेंगलोरच्या विजयाने केल्या चेन्नईच्या आशा पल्लवित; आता एका जागेसाठी ५ दावेदार
“तुमच्याकडे सर्व योजना असतात पण…”, केकेआरविरुद्धच्या विजयानंतर कोहलीची खास प्रतिक्रिया
कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज