---Advertisement---

IPL विरुद्ध काउंटी वाद! केविन पीटरसनला ऑस्ट्रेलियन दिग्गजाने चांगलेच खडसावले; म्हणाले, “अरे मुर्खा, पुरे…”

On: बुधवार, मे 27, 2026 4:22 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट चर्चेत आता ऑस्ट्रेलियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने उडी घेतली आहे. ही चर्चा इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकमुळे सुरू झाली, ज्याने सुचवले की युवा फलंदाज जेकब बेथेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सोडून काउंटी क्रिकेट खेळावे. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या संघाशी जोडण्याआधी पुरेसा खेळण्याचा वेळ मिळेल. आरसीबीने जेव्हा बेथेलला अंतिम अकरामध्ये घेतले नाही आणि बेंचवर बसविले, तेव्हा कूकने हे वक्तव्य केले होते.

आरसीबीने हंगामाच्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये डावाची सुरूवात करण्यासाठी विराट कोहलीसोबत फिल सॉल्टला निवडले, ज्यामुळे बेथेल अनेक सामने बाकावर बसून राहिला. हे पाहून कूकने त्याला इंग्लंडमध्ये परत येऊन काउंटी क्रिकेट खेळावे, असा सल्ला दिला होता. त्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने हस्तक्षेप केला. बेथेल केवळ आरसीबी संघात सामील झाल्यामुळे मौल्यवान अनुभव मिळवत आहे, असे मत पीटरसनने मांडले होते.

“ऍलिस्टर कूकला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव कसा असतो याची अजिबात कल्पना नाही. जेकब, भारतातच राहा. जरी तू खेळत नसलास तरी, तू शिकत आहेस आणि एक खूप चांगला खेळाडू बनशील”, असे पीटरसनने एक्सवर लिहिले होते.

या चर्चेबाबत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ग्लेन मॅकग्रा आणि डॅमियन फ्लेमिंग यांच्यासोबत ‘फास्ट बॉलिंग कार्टेल’ पॉडकास्टवर बोलताना जेसन गिलेस्पी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “सर ऍलिस्टर कूकने यांनी अस काही सुचवण्याच धाडस कसं केले. केपीने तर कहरच केला आहे आणि असं म्हटले आहे की सर ऍलिस्टर कूक यांच्या मताला काही महत्त्व नाही, कारण ते कधीही आयपीएलमध्ये खेळले नाहीत आणि त्यांना काय माहित असेल. मला वाटते सर ऍलिस्टर कूक यांचा मुद्दा योग्य होता, मात्र केपीने ज्याप्रकारे त्यांच्या मतासाठी त्यांना धारेवर धरले- अरे, जरा शांत व्हा. निव्वळ मूर्खपणा.”

“त्याच्या मते तो १५० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळला असता. त्यानेच मार्ग मोकळा केला. केविन, आकाशातील तारे, सूर्य, चंद्र, आपण ज्या पृथ्वीवर चालतो ती आणि आपण जो श्वास घेतो ती हसा, या सर्वांसाठी तुझे आभार. केव्ह, तुझ्यासाठी सगळ काही पैशांसाठीच होते. पुरे झालं आता, मूर्खा”, असेही गिलेस्पी यांनी पुढे म्हटले आहे.

तसेच बेथेल आता इंग्लंडला परतला आहे. त्याआधी त्याला आयपीएलमध्ये बोटाची दुखापत झाल्याने प्लेऑफपूर्वीच संघ सोडावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---