गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) आयपीएल२०२० च्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या क्वॉलिफारयरमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांची तारांबळ उडाली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने टाकलेले एक ट्विट चर्चेत आले आहे.
झाले असे की या सामन्यात दिल्लीने पहिल्या ३ विकेट्स शून्य धावांवरच गमावल्या. पुढेही त्यांची दयनीय अवस्था कायम राहिली. त्यांनी पुढे ४१ धावांत ५ विकेट्स गमावल्या. त्यामुळे दिल्लीने अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे एक ट्विट रिट्विट करत दिल्लीच्या परिस्थितीशी जुळणारी प्रतिक्रिया त्यावर दिली आहे.
सध्या ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत चालू आहे. दरम्यान ट्रम्प यांनी एक ट्विट केले की ‘मोजणी थांबवा’. यात ट्रम्प यांनी मतमोजणीच्या संदर्भात हा ट्विट केला होता.
पण दिल्लीने मुंबईविरुद्ध सामना सुरु असताना हा ट्विट रिट्विट करत लिहिले की ‘आम्ही हे (मोजणी थांबवा) त्या व्यक्तीला सांगत आहोत, जो विकेट्सचा कॉलम अपडेट करत आहे.’ यातून दिल्ली आणखी विकेट्स न जाण्याची अपेक्षा करत असल्याचे स्पष्ट होते.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1324386151482880000
मुंबईने दिल्लीला या सामन्यात २०१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्ली करत असताना मुंबईच्या ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी शानदार गोलंदाजी करत दिल्लीला सुरुवातीला मोठे धक्के दिले. त्या धक्क्यातून दिल्ली सावरु शकली नाही. दिल्लीला २० षटकात ८ बाद १४३ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
याला ‘मुंबई इंडियन्स’ ऐसे नाव, वाईट वेळ आलेली असतानाही…
मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय






