---Advertisement---

वयाच्या 14 व्या वर्षी झळकावले त्रिशतक, आता लिलावात लागली रेकॉर्डतोड बोली! मिळाले ‘इतके’ पैसे

On: शनिवार, मे 2, 2026 4:54 PM
---Advertisement---

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पहिल्यांदाच टी२० मुंबई महिला लीगचे आयोजन केले जात आहे. या लीगच्या पहिल्या हंगामात एकूण ३ संघ भाग घेणार आहेत. त्यासाठी एमसीएने २ मे ला पुरुष आणि महिला लीगसाठी खेळाडूंचा लिलाव ठेवला होता. या लिलावात १६ वर्षाच्या एका युवा खेळाडूनेही सहभाग नोंदवला. या खेळाडूच्या कामगिरीमुळे तिन्ही संघांमध्ये त्या खेळाडूला संघात घेण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. शेवटी आकाश टायगर्सने यामध्ये बाजी मारली.

टी२० मुंबई महिला लीगच्या पहिल्या लिलावात १६ वर्षाच्या इरा जाधव हिला आकाश टायगर्सने १० लाख रुपयांना संघात सामील केले. तिने मागील वर्षी १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. यामुळे ती बरीच चर्चेतही आली होती. ती टी२० प्रकारामधील आक्रमक फलंदाज असून लिलावात तिला खूप मागणी होती. यामुळेची ती या लिलावामधील सर्वात महाग खेळाडू ठरली.

इराने यावर्षीच्या नमन पुरस्कार २०२६ मध्ये जगमोहन दालमिया ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तिला महिला अंडर १९ वनडे ट्रॉफीमध्ये उत्तम कामगिरी केल्याने हा पुरस्कार दिला गेला. याआधी ती १४ वर्षांची असताना महिला प्रीमियर लीगमध्ये लिलावात सहभागी होणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली होती, मात्र त्या लिलावामध्ये तिला कोणीही खरेदी केले नाही. त्यानंतर ती मलेशियामध्ये झालेल्या १९ वर्षाखालील टी२० विश्वचषकासाठी स्टॅंडबाय म्हणून भारतीय संघात सामील झाली होती.

आयपीएल २०२६ च्या हंगामानंतर ही टी२० लीग सुरू होणार आहे. ही लीग इरासाठी महत्वाची असणार आहे. तिने यामध्ये उत्तम कामगिरी केली तर कदाचित तिला महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात खेळण्याची संधी मिळेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---