भारतीय संघात असेही काही खेळाडू होऊन गेले ज्यांच्याकडे क्रिकेटचे भरपूर कौशल्य होते. मात्र, वाढत्या स्पर्धांमुळे क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घ्यावी लागली. असाच एक खेळाडू म्हणजे इरफान पठाण. इरफान हा त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता.
इरफानने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षण देण्यात आपला हात आजमावण्याचा निर्णय घेतला. नुकतेच त्याने बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए) मधील आपला प्रशिक्षणाचा लेवल-२ चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याचबरोबर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एखाद्या संघासाठी प्रशिक्षण करण्याचीही इच्छा व्यक्त केली.
क्रिकेटट्रॅकर सोबत बोलताना इरफान म्हणाला, “ज्यावेळेस तुमच्याकडं जवळपास १७५ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असतो. जसे की, माझ्याकडे आहे. त्यानंतर तुम्ही या अभ्यासक्रम पूर्ण करता. तेव्हा तुम्ही प्रशिक्षणाबाबतची प्रत्येक गोष्ट विस्ताराने समजून घेऊ शकता. त्यामुळे माझ्या मते एनसीए प्रशिक्षकांसाठी खूप चांगले काम करत आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून प्रशिक्षणाचे काम करत आहे. मात्र, मला यामध्ये आणखी सुधारणा करायच्या होत्या.”
पुढे ज्यावेळी त्याला, भविष्यात आयपीएलच्या संघांचा प्रशिक्षक म्हणून काम करायला आवडेल का? असे विचारले असता त्यावर तो म्हणाला, “नक्कीच पुढे जाऊन आयपीएलच्या एखाद्या संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम करायला मला आवडेल आणि असे होण्याची मी आशा देखील करतो.”
सध्या भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड एनसीएचा प्रमुख आहे. याबाबत बोलताना इरफान म्हणाला, “राहुल द्रविड सारखा खेळाडू एनसीसीचा प्रमुख आहे. हीच गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरते. माझ्या मनात द्रविड बाबत खूप सन्मान आहे. त्यांनी पूर्ण इमानदारीने त्यांचे एमसीएमधले काम केले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, त्यांनी भारताच्या १९ वर्षाखालील खेळाडूंना आणि भारत ‘अ’ च्या खेळाडूंना कशाप्रकारे घडवले आहे. त्याचबरोबर ते प्रत्येक प्रशिक्षकासोबत आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण करतात. प्रशिक्षणाबाबत त्यांचा असलेला दृष्टिकोनाबाबत देखील ते चर्चा करत असतात.”
एनसीएमधल्या अभ्यासक्रमाबाबत बोलताना इरफान म्हणाला, “हा एक अत्यंत कमालीचा अभ्यासक्रम होता. हे माझ्यासाठी प्रशिक्षणाच्या कामात फायदेशीर ठरेल. ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. ८ दिवसांच्या अभ्यासक्रमात देखील प्रशिक्षणाबाबतच्या आपण महत्त्वाच्या गोष्टी शिकत असो, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. मला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता, कारण शिकत राहणे नेहमीच आपल्या अनुभवात भर घालत असते. तसेच आपल्याला नव्या पिढीसाठी नव्या प्रशिक्षण तंत्राचा देखील अभ्यास केला पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या –
–‘लॉर्ड्समध्ये शतक बनवणेच सर्वकाही नाही, त्याची ८३ धावांची खेळीही उत्तमच’, महान भारतीय क्रिकेटरकडून कौतुक
–चोरी प्रकरणात बीसीसीआयने हस्तक्षेप करण्याची रसूलची मागणी, म्हणाला…
–टेलएंडरची कमाल! शमीनंतर झिम्बाब्वेच्या ८ व्या क्रमांकाच्या खेळाडूने २४२ च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या ‘इतक्या’ धावा