---Advertisement---

IRE vs IND: रोहित शर्माचा रेकॉर्ड धोक्यात! संजू सॅमसनला पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी

On: बुधवार, जून 24, 2026 6:58 PM
---Advertisement---

भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झाला असून या दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना २६ जून रोजी खेळला जाणार आहे. या दौऱ्यात संजू सॅमसनला क्रमांक १ बनण्याची संधी आहे, त्यामुळे रोहित शर्माचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. भारत-आयर्लंड टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.

भारत-आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी२० मालिकांमध्ये २०० पेक्षा अधिक धावा करणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. त्याने चार सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह २०१ धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्ती घेतली असल्याने तो भारताच्या टी२० संघामध्ये नाही. त्यामुळे त्याचा हा विक्रम मोडण्याची संधी भारताकडून संजूला आणि आयर्लंड संघाकडून हॅरी टेक्टरला आहे. संजूला फॉर्म पाहता तो रोहितला मागे टाकून अव्वल स्थानी पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

आयर्लंडच्या हॅरीने भारताविरुद्ध ५ टी२० सामन्यांमध्ये ३०.७५च्या सरासरीने १२३ धावा केल्या आहेत. दुसरीकडे संजूने आयर्लंडविरुद्ध तीन टी२० सामन्यांमध्ये ५०.००च्या सरासरी आणि १७१.०१ च्या स्ट्राईक रेटने ११८ धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांची आकडेवारी पाहिली तर रोहितचा विक्रम मोडण्याची दोघांना चांगली संधी आहे.

आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या सध्याच्या भारतीय संघात, दोन्ही देशांमध्ये खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत १०० पेक्षा अधिक धावा करणारा संजू एकमेव खेळाडू आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर इशान किशन आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांमध्ये २९ धावा केल्या आहेत.

या मालिकेतील दुसरा सामना २८ जूनला खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत नव्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या मालिकेत भारताने नेतृत्व श्रेयस अय्यर करणार असून तो पहिल्यांदाच भारताचे कर्णधारपद भुषवणार आहे.

आयर्लंड दौऱ्याच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---