---Advertisement---

VIDEO: वैभव सूर्यवंशी बॅटिंगमध्ये फ्लॉप, बॉलिंगमध्ये हिट! चार चेंडूत घेतल्या 2 विकेट्स

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2026 2:18 PM
---Advertisement---

वैभव सूर्यवंशीचे दुलीप ट्रॉफीमध्ये निराशाजनक पदार्पण झाले. त्याने फलंदाजीमध्ये निराशा केली असली, तरी गोलंदाजीत सर्वांना चकित केले आहे. बंगळुरू येथे ईस्ट झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांच्यात दुलीप ट्रॉफी 2026 चा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात वैभव 8 धावा करत बाद झाला, मात्र जेव्हा त्याच्यावर गोलंदाजीची जबाबदारी आली तेव्हा त्याने ती चोखपणे पार पाडली.

या सामन्यात ईस्ट झोनने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी सुदीप कुमारच्या 146 धावा आणि शहबाज अहमदच्या 167 धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 467 धावसंख्या उभारली.

वैभवची कहर गोलंदाजी
नॉर्थ ईस्ट झोन पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला असता 111 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांना फॉलो-ऑन मिळाला, मात्र दुसऱ्या डावातही त्यांच्यावर संकट आले आहे. या डावात कर्णधार आणि विकेटकीपर इशान किशनने वैभवला चेंडू दिला असता त्याने कमाल केली.

वैभवने 28 व्या षटकात अवघ्या चार चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. त्याने किशन लिंगडोह आणि इमलीवती लेमतूर यांना बाद केले. या सामन्यात त्याने तीन षटकात केवळ 11 धावा देत 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

ईस्ट झोनचा विजय अन् सेमीफायनलमध्ये एंट्री
हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता, जो तो जिंकल्यावर ईस्ट झोन उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हा सामना ईस्ट झोनने एक डाव आणि 210 धावांनी जिंकला. यामुळे वैभवला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. अशात त्याला उपांत्य फेरीत चांगली कामगिरी करावी लागेल.

स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वैभवने यंदा गोलंदाजीतही कमाल केली आहे, मात्र त्याला आता त्याच्या फलंदाजीत आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

शहबाज अहमद हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला. उपांत्य फेरीचे सामने 30 ऑगस्टला खेळले जाणार आहेत. यामधील पहिल्या सामन्यात ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन समोरा-समोर येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---