भारत आणि श्रीलंका ( India vs Srilanka) दोन्ही संघात सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ झाला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ मंगळवारी होणार आहे. या दरम्यान असा निर्णय घेण्यात आला आहे की, तिसऱ्या दिवसाचा सामना लवकर सुरू करण्यात येईल.
यादरम्यान श्रीलंकेचा संघ काहीसा अडचणीत सापडलेला दिसत आहे. पराभवापासून वाचण्यासाठी संघाला बरीच मेहनत घ्यावी लागेल. कोलंबोमध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खूप अडथळा आला. आधी भारताच्या डावादरम्यान पाऊस आला, ज्यामुळे जवळपास दोन तास सामना होऊ शकला नाही. त्यानंतर जेव्हा भारताचा डाव संपला आणि श्रीलंकेची फलंदाजी सुरू झाली, तेव्हा अवघ्या दोन चेंडूंनंतर पुन्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. मात्र, नंतर सामना सुरू झाला, जो जवळपास 6 वाजेपर्यंत चालला.
यादरम्यान आता असा निर्णय घेण्यात आला आहे की, आज जो वेळ वाया गेला आहे, त्याची भरपाई आगामी दिवसांमध्ये केली जाईल. आता तिसऱ्या दिवसाचा खेळ 15 मिनिटे आधी सुरू होईल. याआधी सामना सुरू होण्याची वेळ 10 वाजताची होती, जी आता मंगळवारी 9 वाजून 45 मिनिटांची असणार आहे.
यादरम्यान टीम इंडियाने (Team india) श्रीलंकेसमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. यानंतर श्रीलंकेचा डाव सुरू झाल्यावर त्यांनी आतापर्यंत 2 विकेट गमावल्या आहेत. भारताने आपल्या पहिल्या डावात 503 धावा केल्या. आधी देवदत्त पडिक्कलने (Devdatta paddikal back to back Century) 117 धावांची खेळी केली, त्यानंतर ध्रुव जुरेलनेही (Dhruv Jurel) आपले दुसरे शतक पूर्ण केले. ध्रुवने 177 चेंडूंमध्ये 115 धावा केल्या. तसेच कर्णधार शुबमन गिलने 50, तर ऋषभ पंतने 63 धावांचे योगदान दिले, ज्याच्या बळावर टीम इंडियाने 503 धावा करून डाव घोषित केला.
यादमन्यात जेव्हा श्रीलंकेच्या डावाची सुरुवात झाली, तेव्हा दुसऱ्याच षटकात पहिली विकेट पडली. तोपर्यंत संघाच्या खात्यात केवळ एकच धाव आली होती. त्यानंतर जेव्हा मानव सुथार (Manav Suthar) आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याने आणखी एक विकेट घेतली. जशी दुसरी विकेट पडली, दिवसाचा खेळ संपवण्यात आला. तोपर्यंत श्रीलंकेने केवळ 8 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. या वेळी श्रीलंकेचा संघ अडचणीत आहे, टीम इंडियाने दिलेलं लक्ष्य श्रीलंका पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकूणच तिसऱ्या दिवसाचा खेळ अतिशय रंजक होण्याची शक्यता आहे.






