---Advertisement---

IND vs SL: ऋषभ पंतच्या दुखापतीवर कोच मॉर्केलची मोठी अपडेट! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2026 9:58 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेदरम्यान (India vs Srilanka) कसोटी मालिकेचा दुसरा सामना एसएससी (SSC), कोलंबो येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना ऋषभ पंतला (Rishbh Pant) दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो अद्याप क्षेत्ररक्षण किंवा यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरलेला नाही.

याच दुखापतीसह पंतने दुसऱ्या दिवशी फलंदाजी केली आणि एक शानदार अर्धशतकही झळकावले. मात्र, तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत यष्टीरक्षणासाठी उतरला नाही आणि तो मैदानाबाहेर खांद्याला पट्टी बांधलेला दिसून आला.

पंत चौथ्या दिवशी यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात उतरेल की नाही, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आता यावर टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Morne Morkel on Rishbh Pant) यांनी मोठं विधान केलं आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॉर्ने मॉर्केल यांनी ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत माहिती दिली. श्रीलंका दौऱ्यावर आतापर्यंत ऋषभ पंतची फलंदाजीतील कामगिरी अतिशय उत्तम राहिली आहे. सध्या भारतीय संघाचे फिजिओ पंतच्या दुखापतीवर काम करत आहेत आणि कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) आशा आहे की तो लवकरच पूर्णपणे फिट होईल.

प्रेस कॉन्फरन्समध्ये ऋषभ पंतच्या फिटनेसवर अपडेट देताना मॉर्ने मॉर्केल म्हणाले की, ‘त्याच्या उजव्या खांद्याला बरीच दुखापत झाली आहे. आज सकाळी जेव्हा त्याने वार्म अप (सराव) करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या हाताची हालचाल मर्यादित झाली होती. आम्ही आज रात्री त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. आशा आहे की तो उद्या यष्टीरक्षण करताना दिसेल.’ यावरून हे स्पष्ट होते की, उद्या पंत पुन्हा मैदानावर यष्टीरक्षण करताना दिसू शकतो.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत ऋषभ पंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने शेवटच्या 3 डावांपैकी 2 वेळा अर्धशतक झळकावले असून यष्टीमागे उत्कृष्ट कॅच आणि स्टम्पिंगही केली आहेत. आता ऋषभ पंत चौथ्या दिवशी मैदानात उतरणार का किंवा त्याची दुखापत किती गंभीर आहे हे तो मैदानात उतरल्यावर समजेल. प्रशिक्षकांच्या विधानाप्रमाणे जर त्याची उद्यापर्यंत रिकव्हरी झाली तर तो मैदानात उतरण्याची जास्त शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---