---Advertisement---

हार्दिकच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात पाऊस बनू शकतो व्हिलन? जाणून घ्या पिच रिपोर्ट

On: रविवार, जून 26, 2022 7:47 PM
Hardik-Pandya-2
---Advertisement---

आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना रविवारी (२६ जून) डबलिनमध्ये खेळला जाणार आहे. हार्दिक पंड्या या सामन्यात भारताचा कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे युवा खेळाडूंना आयर्लंडविरुद्ध संधी मिळाली आहे. हार्दिक पहिल्यांदाज भारताचे नेतृत्व करणार असला, तरी पहिल्या सामन्यात पावसामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय वेळनुसार आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला सामना रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात त्यांच्या बेंच स्ट्रेंथला आजमावू शकते, पण सामन्यात पाऊस अजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी पाऊस आला, तरी भारतीय संघासाठी संघासाठी ही एका अर्थाने चांगलीच बाब असेल.

एक्यूवेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार, रविवारी डबलिनमध्ये दिवसभर ढगाळ वातवरण राहील आणि पाऊस येण्याची ९० टक्के शक्यता आहे. सामना सुरू असतानाही असे होऊ शकते. जर असे झाले तर, चाहत्यांची नक्कीच निराशा होईल. दिवसा त्याठिकाणचे तापमान १७ डिग्री असेल, तर रात्री हा आकडी अजूनच कमी होण्याची शक्यता आहे. पाउस झाल्यावर जार सामना खेळला गेला, तर वेगवान गोलंदाजांसाठी वातावरण फायदेशीर ठरेल. डबलिनमधील तापमान सध्या खूप कमी आहे आणि हवेतील नमी वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरेल.

डबलिनच्या मालाहाईडमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. तसेच गोलंदाजांना याठिकाणी चांगला बाउंस देखील मिळतो. अशा परिस्थितीत चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येतो आणि मोठे शॉट खेळणे सोपे होऊन जाते. याठिकाणी आतापर्यंत १५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ६ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर ९ वेळा लक्ष्या पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. मागच्या पाट टी-२० सामन्यांमध्ये याठिकाणी १८० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली गेली आहे. याठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ सरासरी १६०, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सरासरी १४० धावा करतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

IRE vs IND | पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय धुरंधर बनवू शकतात ‘हे’ पाच महत्वाचे विक्रम

फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती

बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---